ईव्हीएममध्ये बिघाड,पाण्याची असुविधा
मतदान केंद्रावर सकाळपासून उस्फूर्तपणे रांगा अमरावती : अमरावती जिल्ह्याचा २० वा खासदार निवडीसाठी यावेळी शहरासह गावागावांत उत्साह दिसून आला. काही केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाला तर कुठे पाण्याची असुविधा झाली.
तरी मतदारांमध्ये उत्स्फूर्त उत्साह दिसून आला.
अंगाची काहिली करणारे उन्ह राहणार असल्याने निवडणूक विभागाने मंडपाची व्यवस्था केली असली तरी मतदारांच्या उत्साहाने ऐनवेळी अनेक केंद्रांवर नियोजन कोलमडल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी सुरू आहे.
त्यातच गुरुवारी रात्री सार्वत्रिक पाऊस झाल्याने सकाळपासूनच वातावरणात थंडावा होता,त्यामुळे बहुतांश नागरिकांची पावले मतदान केंद्रांकडे वळली.
शिवाय शहरासह ग्रामीण भागात तसेच मुस्लिमबहुल परिसरातील केंद्रांवर एकच गर्दी झाल्याचे चित्र मतदान केंद्रांवर दिसून आले.
दुपारनंतरही कायम होता.
त्यामुळे मतदानाचा टक्का यावेळी वाढला आहे. काही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी झाली.
त्यातुलनेत मतदान करावयास किमान तीन ते चार
मिनिटांचा वेळ लागत असल्याने केंद्रांवर रांगा वाढायला लागल्या व सावलीसाठी असलेला मंडप काही ठिकाणी कमी पडू लागला व मतदारांनी सावलीचा आधार घेतला.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕मतदारांचा ओघ---
ज्येष्ठांमध्ये उत्साह,नवमतदारही सरसावले-
यावेळी मतदानात ज्येष्ठ मतदारांनी उत्साह दाखविला या मतदारांसह दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक केंद्रांवर व्हीलचेअरची सुविधा होती.
पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवमतदारांमध्ये मतदानासाठी कमालीचा उत्साह दिसून आला.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕मतदान यंत्रात बिघाड,मतदानाचा खोळंबा--
ग्रामीणमध्ये धारणी येथील मतदान केंद्र क्रमांक ७५, चांदूरबाजार तालुक्यात माधान येथील केंद्र क्रमांक ८१, शहरात रहाटगाव व वर्धा मतदारसंघात धामणगाव तालुक्यात कावली वसाड येथे ७० व ७१ क्रमांकाच्या मशीनमध्ये बिघाड झाला. याठिकाणी झोनल अधिकारी व तांत्रिक अधिकारी त्वरेने पोहचून यंत्राची दुरुस्ती करण्यात आली.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕ मतदार वोटर स्लिप पोहोचल्याच नाहीत
-मतदानाच्या पाच दिवस आधी मतदार चिठ्ठया केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत मतदारांच्या घरी पाठविण्याचे निर्देश होते.
प्रत्यक्षात शहरातल्या काही भागात व्होटर स्लिप पोहचल्याच नाहीत.
त्यामुळे मतदारांची पायपीट झाली.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
लोकमत अमरावती
No comments:
Post a Comment