तुमच्या पाल्याला या महिन्यात स्टार STAR मिळाले का?🏤🏤🏤🏤🏤🏤🏤🏤🏤🏤🏤🏤🏤🏤🏤🏤🏤🏤प्राथमिक विद्या मंदिर,बार्शीउपक्रमशील शाळा पुरस्कृत माझी शाळा माझा उपक्रम👩💻👩💻👩💻👩💻👩💻👩💻👩💻👩💻👩💻👩💻👩💻👩💻👩💻👩💻👩💻👩💻👩💻👩💻
नुकत्याच सर्व शाळा १५ जून पासून सुरू झाल्या आहेत.तर मराठवाढाभागातील काही शाळा ३० जून पासून सुरू झालेले आहेत.उन्हाळा सुट्टी संपवून शाळेत येणारे नवीन मुलं शाळेत रोजच्या रोज कसे येईल.यासाठी प्रत्येक शिक्षक प्रयत्नशील असतात.शहरात मुले शक्यतो रोज हजर असतात तर ग्रामीण भागात याचे प्रमाण कमी-जास्त असते.प्रत्येक मूल शिकले पाहिजे यासाठी सर्व शिक्षक धडपडत असतात.यासाठी नवनवीन उपक्रम राबवीत असतात.शासन स्तरावरून मोफत पाठ्यपुस्तके,शालेय पोषण आहार शिष्यवृत्ती,आरोग्यदायी योजना यासारख्या अनेक उपक्रम हाती घेतले जातात.उद्देश फक्त इतकाचमुलांना शाळेची ओढ निर्माण झाली पाहिजे व प्रत्येक मूल शिकला पाहिजे आणि आपले हेतू साध्य झाले पाहिजे. या सर्व गोष्टीतून स्टार STAR देण्याचा उपक्रम आमच्याप्राथमिक विद्या मंदिर बार्शीशाळेत प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी राबविला जातो.या उपक्रमात शाळेतील सर्व शिक्षक,विद्यार्थी व पालक यांना एक प्रकारे सहभागी करून घेऊन त्याचा फायदा विद्यार्थ्यांना दिला जातो.यामुळे----------🟣प्रत्येक विद्यार्थी न चुकता रोजचा रोज अभ्यास पूर्ण करतो.🟣शाळेत वर्गात घडत असलेल्या प्रक्रियेमध्ये सर्व पालकांचा सहभाग घेतला जातो.🟣विद्यार्थी अभ्यासात कोठे कमी पडतो;यावर शिक्षक व पालक यांना लक्ष केंद्रित करता येतो.💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥मुलांना स्टार देण्याची पद्धत कशी आहे❓-----हा उपक्रम सर्व स्तरातील विद्यार्थ्यांवर व विद्यार्थ्यांसोबत राबविता येतो.रोज आपण जे अध्यापन करतो त्यावर आधारित स्वाध्याय देतो ते विद्यार्थी पूर्ण करतात.जेव्हा ते स्वाध्याय/HOME WORK पूर्ण करतात.त्यावेळी त्यांना त्यामध्ये स्वाध्याय पूर्ण,अचूकता व अक्षर वळण यासोबत अभ्यासाच्या शेवटी पालकांची सहीयावर आधारित सहीच्या शेजारी आपण रोज good या शब्दाचा वापर करतो.
महिन्याच्या शेवटी एकूण किती वेळा विद्यार्थ्याला good मिळतात याची बेरीज करूनया महिन्याचा STAR/स्टारचा मानकरी कोण हे आपणास सहज ठरविता येतो.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥🟣यावर पालकांची पण कसोटी लागते प्रत्येक पालक किमान वेळ काढून विद्यार्थ्यांचे होमवर्क रोजच्या रोज पाहत जातील.🟣यामुळे आपला पाल्य काय करतो अथवा कुठे कमी पडतो या गोष्टी लक्षात येतात.🟣पालक न चुकता पाहतात म्हणून अभ्यासात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही.🟣पालकांची शेवटी सही असल्याने अभ्यास तपासताना प्रत्येक शिक्षकास सुटसुटीत पणा येईल.🟣ही गोष्ट करताना कोणत्याही प्रकारची खर्चिक नाही या प्रक्रियेत सर्वांचा समावेश केला असल्यामुळे आपला पाल्य हा शैक्षणिक गुणवत्तापूर्ण असेल🟣महिन्याच्या शेवटी येणारे एकूण स्टार यावर आधारित विद्यार्थी रोज किती अभ्यास करतात या गोष्टी लक्षात येईल.🟣 यामुळे मुलांना अभ्यासाची आवड निर्माण होईल.🟣मुलाला मिळालेले STAR पाहून पालकांचे समाधान होईल.यामुळे मुलांचे शाळा बुडवण्याचे प्रमाण देखील कमी होऊन उपस्थिती प्रमाण नक्कीच वाढेल.⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐शेवटी एवढेच की मुलांना त्यांच्या मूलभूत ध्येय पूर्ण करण्यासाठी व आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग करून घेता येईल.यामुळे मुलांच्या गुणवत्ता वाढी बरोबर शाळेची ही गुणवत्ता वाढविण्यास मदत होईल.ही प्रक्रिया खर्चिक नसून सहज आपल्याला राबवता येईल.
आणि आपण ती प्रक्रिया राबवू शकतो प्रत्येक मूल आपले शैक्षणिक उद्दिष्ट या प्रक्रियेतून साध्य करू शकतो.यामधून नवीन गोष्टी शिकण्याची ओढ निर्माण होईल.ज्या वर्गात मुलांची संख्या जास्त आहे तिथे या प्रक्रियेत अडचणी येण्याची शक्यता आहे.पण वर्ग प्रमुख यांच्या साह्याने प्रक्रिया सुलभपणे राबवता येईल.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राहुल दत्तात्रय म्हमाणेप्राथमिक विद्या मंदिर, बार्शी🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟जर आपणही याप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असालतर नक्की आमच्यापर्यंत पोहोचवाआम्ही आपले उपक्रम सर्व शिक्षकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू.....8482824588/9822487073
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. मला सविस्तर माहिती द्याल. माझ्या शाळेत सुद्धा मी हा उपक्रम राबविणार. खूपच आवडला.
ReplyDelete