चांद्रयान-३
🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚🌚
चला होऊया विद्यार्थ्यांसह इतिहासाचे साक्षीदार आज दुपारी ठीक:-२ वाजून ३५ मिनिटे
काउंटडाउन सुरु: तिरुपतीमध्ये मॉडेलसह पूजा
चंद्रयान- ३ आज अवकाशात झेपावणार; रॉकेट नेणार भारतीयांचे स्वप्न गगनात
🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀
॥ श्रीहरीकोटा : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान- ३ चे शुक्रवारी प्रक्षेपण होणार आहे.
या प्रक्षेपणाची गुरुवारी उलटगणती सुरू झाली. या मोहिमेच्या यशासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांनी बुधवारी तिरुपती बालाजी मंदिरात पूजा केली. तर इस्रोप्रमुख एस. सोमनाथ यांनी सुल्लूरपेटा येथील श्री चेंगलम्मा परमेश्वरिनी मंदिरात पूजा करून देवीचा आशीर्वाद घेतला. इस्त्रोच्या नियोजनानुसार, २३ किंवा २४ ऑगस्टला यानाचे चंद्रावर 'सॉफ्ट लँडिंग' करण्यात येणार आहे.
ही मोहीम यशस्वी ठरली तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरेल.
यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर यान उतरवले असले तरी दक्षिण ध्रुवावर ते पोहचू शकलेले नाहीत.
देशाच्या महत्त्वाकांक्षी
चांद्रयान- ३ मोहिमेअंतर्गत शुक्रवारी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या २५ तास ३० मिनिटांच्या काऊंटडाऊनला गुरुवारी दुपारी सुरुवात झाली. एलव्हीएम एम४ या अजस्र बाहुबली रॉकेटद्वारे चांद्रयान- ३ अंतराळात झेपावेल.
या यानात ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असे तीन प्रमुख भाग आहेत.
रोव्हरला लँडरच्या आत ठेवण्यात आले आहे. प्रक्षेपणानंतर यान सुरुवातीला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा
घालेल आणि नंतर चंद्राच्या दिशेने रवाना होईल. चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर ऑर्बिटर पृथ्वीच्या या उपग्रहाभोवती प्रदक्षिणा घालेल.
२३ किंवा २४ ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचे इस्रोचे नियोजन आहे.
त्यानुसार ऑर्बिटरपासून विलग होऊन लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी रवाना होईल. चांद्रयान- २ मोहिमेवेळी लँडरला चंद्रावर अलगदपणे उतरण्यात अपयश आले होते.
त्यावेळी झालेल्या चुकांमधून धडा घेत यावेळी लँडरचे हळूवारपणे लँडिंग होईल, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️
। दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरेल भारत चंद्रावर आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनी आपले यान उतरवले आहे. अमेरिकेने तर चंद्रावर मानवाला देखील उतरवले होते.
परंतु चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अद्याप एकही देश पोहोचलेला नाही. इस्रोचे चांद्रयान याच ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.
चांद्रयान- ३ मोहीम यशस्वी ठरली तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरेल. तर चंद्रावर यान उतरवणाऱ्या देशांच्या यादीत भारत चौथा असेल.
🛸🛸🛸🛸🛸🛸🛸🛸🛸🛸🛸🛸🛸🛸🛸🛸🛸🛸
*यंदाच्या मोहिमेतील सुधारणा.....
1)लॅण्डरच्या चार कोपऱ्यांवर चार इंजिन (स्टर्स) असतील;पण गेल्या वेळी मध्यभागी असलेले पाचवे इंजिन काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय, दोन इंजिनांच्या मदतीने अंतिम लॅण्डिंग केले जाईल.
2)चंद्रयान- इला ऑर्बिटर नसून एक प्रोपल्शन मॉड्यूल असेल जे लॅण्डर आणि रोव्हरपासून वेगळे झाल्यानंतरही चंद्राभोवती फिरेल आणि चंद्रावरून पृथ्वीवरील जीवनाची पदचिन्हे शोधण्याचा प्रयत्न करेल.
3)लॅण्डरमध्ये ५,रोव्हरमध्ये २ उपकरणे आहेत.
ते तापमान, माती व वातावरणातील घटक आणि वायू याची नोंद घेतील.
4)चंद्रावर सॉफ्ट लॅण्डिंग अतिशय कठीण आहे.
हे अभियान इस्रोसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. ही मोहीम यशस्वी झाली पाहिजे,जेणेकरून भारत अंतराळ संशोधनात मोठा टप्पा पार करू शकेल.
जी. माधवन नायर,
माजी अध्यक्ष,इस्रो
No comments:
Post a Comment