Tuesday, 4 July 2023

एलकेजी - यूकेजीचा प्रस्ताव | मान्यतेत अडकला


एलकेजी - यूकेजीचा प्रस्ताव | मान्यतेत अडकला

शिक्षण आयुक्त दरबारी प्रस्ताव पडून; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट
सोलापूर

 जिल्ह्यातील पाच हजार लोकसंख्येच्या १०० गावांमध्ये जिल्हा परिषदेतर्फे एलकेजी व यूकेजीचे वर्ग सुरु करण्याची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केली.
 त्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयास पाठविला. 
शाळा सुरु होऊन आता १५ दिवस झाले, तरीपण अद्याप त्या प्रस्तावाला शिक्षण आयुक्तालयाकडून मान्यता मिळालेली नाही.
 त्यामुळे आता यावर्षी एलकेजी-यूकेजीचे वर्ग सुरु होणार नाही, अशी स्थिती आहे.

जिल्ह्यात दोन हजार ७९५ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये दोन लाख विद्यार्थी आहेत.
 पटसंख्या कमी झाल्याने शिक्षक अतिरिक्त होण्याची संख्या देखील लक्षणीय आहे. 
जिल्ह्यातील जवळपास ६० पेक्षा अधिक शाळांची पटसंख्या १० आणि २० झाली आहे. खासगी इंग्रजी व सेमी
इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी कमी होत असल्याची चिंता नेहमीच शिक्षकांसह प्रशासनाला सतावते. 'नवउपक्रमशील सीईओ' म्हणून राज्यभर ख्याती मिळवलेल्या दिलीप स्वामी यांनी त्यावरही उपाय शोधलाच. गावातील चिमुकल्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एलकेजी युकेजीचे शिक्षण द्यायचे आणि पुढे ती मुले जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकतील, असा त्यामागील हेतू आहे. 
पण, शिक्षण आयुक्तालयाकडून मान्यता न मिळाल्याने हा हेतू साध्य होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. 
अधिकाऱ्यांनीही मान्यतेबाबत तोंडावर बोट ठेवले आहे.
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
आता एलकेजी-यूकेजी पुढच्याच वर्षी----------

एलकेजी - युकेजी शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी दरवर्षी शेजारील गावात किंवा शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जातात. 
त्या चिमुकल्यांना तशाप्रकारचे शिक्षण जिल्हा परिषदेतर्फे मोफत शिक्षण दिले जाणार होते. 
पण, आता प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन चिमुकल्यांची शाळा सुरु झाली आहे. मान्यतेला विलंब झाल्याने आता ते वर्ग सुरु होणार की नाही, अशी स्थिती आहे. 
तरीपण, मान्यता कधी मिळेल आणि त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेतात, 
याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
📗📗📗📗📗📗📗📗📗📗📗📗📗📗📗
शिक्षणमंत्र्यांची नुसतीच घोषणा.....

■ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये देखील सेमी इंग्रजी सुरू करण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी कदाचित पुढील क सुरु होऊ शकते.
 पण, सोलापूर जिल्हा परिषदेने एलकेजी- युकेजी वर्ग सुरु करण्याचा प्रस्ताव २५ दिवसांपूर्वी पाठवूनही त्याला शिक्षण आयुक्तालयाने मान्यता दिलेली नाही, हे विशेष
🧾🧾🧾🧾🧾🧾🧾🧾🧾🧾🧾🧾🧾🧾🧾
सकाळ सोलापूर

No comments:

Post a Comment