Sunday, 9 February 2025

अखेर नियतीने डाव साधलाच.....

आमचे बंधू कै.संतोष चंद्रकांत म्हमाणे (वयवर्ष 35) यांचे रविवार दिनांक 9 फेब्रुवारी सायंकाळी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.

ते श्री.सिद्धाराम म्हमाणे दैनिक जनसत्तेचे पत्रकार व मोहोळ शिवसेना तालुका अध्यक्ष यांचे ते लहान बंधू होते. अत्यंत शांत व निर्मळ स्वभावाचे,दिवस-रात्र काबाडकष्ट करून आपल्या संसाराचा गाडा ते हाकत होते.

एके दिवशी सर्व लोकांच्या आग्रहासत्व ते लाईट फिटिंग कामासाठी ते डेपोवर चढले असता त्यांना जोरात चा विजेचा झटका बसला,यामध्ये ते लाईट पोलच्या खांबावरून खाली पडले व त्यांच्या मानेला गंभीर अशी दुखापत झाली.
त्यांना उपचारासाठी सोलापूर,पुणे असे विविध ठिकाणी दाखल करून उपचार देखील करण्यात आले होते,यासाठी आमचे बंधू डॉक्टर श्री.अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.

 अखेर म्हणतात न...
जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला
याचप्रमाणे प्रयत्नांची पराकाष्ठा करून देखील डॉक्टर व त्यांच्या टीमला यश आले नाही.
अखेर 9 फेब्रुवारी रोजी संतोष यांची प्राणज्योत मावळली.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक कन्या, चिरंजीव,आई-वडील असा परिवार आहे.

ईश्वर त्यांच्या कुटुंबास या दुःखातून सावरण्याचे  बळ देवो.. कै.संतोष यांच्या आत्म्यास शांती देवो हीच सदिच्छा......
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
 संतोष तुझा हसरा चेहरा
तुझ्या मनाचा तो भोळेपणा
नाही दुखावले तू कधी कोणाला
नाही केलास कधी तू मोठेपणा
सोडून गेलास तू अचानक
येथे खूप तुझी आठवण
परत येशील हीच अपेक्षा
तुझ्या पुण्य आत्म्यास शांती लाभो!!!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
⭕⭕शोकाकुल⭕⭕
RDM_SMS 
समस्त म्हमाणे परिवार
समस्त ग्रामस्थ कोरवली

No comments:

Post a Comment