Monday, 17 February 2025

मांडळखडी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा निलेश ठोके यांचे सुर्यनमस्कार व योग प्रात्यक्षिके सादरीकरण


साक्री:योगा चे महत्व हळूहळू सर्व स्तरावर, जगभर मान्य होताना दिसून येत आहे.
तसेच संतांची परंपराला लाभलेल्या महाराष्ट्रात भूमीत अनेक थोर संत होऊन गेले आणि या संतांनी देखील आरोग्याचे महत्त्व विशद करताना  पहिले सुख निरोगी काया अशा शब्दात आरोग्याचे-स्वास्थ्याचे महत्व सांगितले आहे.

 नुकताच धनेर एज्युकेशन सोसायटी संचलित कै.आ ज पाटील खाजगी  प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा मांडळखडी येथे दि 4 फेब्रुवारी रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिन
मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे महर्षी पतंजली परिवारातील योगसाधक प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले निलेश ठोके यांनी सादर केलेली सुर्य नमस्कार सह योगासन प्रात्यक्षिके.
सकाळी आठ वाजता शाळेच्या प्रांगणात शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित झाले.

सुरुवातीला निलेश ठोके यांनी सर्व विद्यार्थ्यांना सुर्यनमस्कार सह ओमकार साधना व प्राणायामची कृतीची प्रात्यक्षिक करून दाखवले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून प्राणायामचे व सुर्यनमस्कार प्रात्यक्षिक करून घेतले
निलेश ठोके यांनी सूर्यनमस्कार कृती सह विविध प्रकारची अवघड योगासने प्रात्यक्षिके करून उपस्थित सर्वांची दाद मिळवली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी देखील आनंदाने व मोठ्या उत्साहाने कुतूहल पूर्वक प्राणायाम कृती सह योग प्रात्यक्षिके विधी पुर्वक करायचा प्रयत्न केला.

निलेश ठोके यांनी सर्वांनाच सूर्यनमस्काराचे व योगाचे महत्त्व पटवून दिले व नियमितपणे योगा करायचे महत्त्व समजावून दिले

शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक पाटील यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करतेवेळी निलेश ठोके यांचे स्वागत केले तसेच शाळेतील विद्यार्थी प्रिय शिक्षक सागर खैरनार यांनी सर्वांचे आभार मानले अशा प्रकारे मांडळखडी या पूर्णतः आदिवासी बहुल  लोकवस्ती असलेल्या गावी उच्च प्राथमिक विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
याप्रसंगी शाळेच्या शा व्य स च्या अध्यक्षा रायल देसाई यांचे सह श्री शांताराम मालचे आधी ग्रामस्थ उपस्थित होते 

शाळेत अनोख्या पद्धतीने जागतिक सुर्य नमस्कार दिन साजरा केल्याबद्दल आणि योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण पाहून शा व्य स अध्यक्षा,तसेच इतर ग्रामस्थ व पालकांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना योग करण्याविषयी प्रोत्साहित केले तसेच निलेश ठोके यांचे कौतुक केले आणि शुभेच्छा देत समाधान व्यक्त केले.

प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना खरंतर अशा प्रकारे योग शिक्षणाची गरज आहे आणि याची जर सुरुवात प्राथमिक स्तरावर झाली तर खरोखर विद्यार्थ्यांना भविष्यात शारीरिक मानसिक
जडणघडणीत नक्कीच फायदा होऊ शकतो अशा शब्दात शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक पाटील यांनी मनोगतात सांगितले.

याप्रसंगी योगसाधक प्राथमिक शिक्षक असलेले निलेश ठोके यांनी उपस्थित सर्वांना आवाहन करताना सांगितले की धावपळीच्या युगात निरोगी राहण्याचा स्वतःला सुदृढ राहण्याचा सर्वात स्वस्त आणि खात्रीशीर मार्ग म्हणजे दैनंदिन जीवनात सर्वांनीच अगदी नियमितपणे दररोज किमान दहा ते पंधरा-वीस मिनिटे योगाभ्यास दररोज केला पाहिजे.

राष्ट्रीय स्तरावर योगासन स्पर्धेत सुवर्णपदक विजेते निलेश ठोके यांनी यापूर्वी क्रीडाभारती धुळे, महर्ष पतंजली योग समिती पुणे,  तसेच शासकीय रक्तपेढी धुळे,शासकीय रक्तपेढी नंदुरबार, शारदा नेत्रालय धुळे आधी संस्थांच्या माध्यमातून आयोजित विविध स्पर्धा तसेच समाजोपयोगी विधायक उपक्रमात सहभाग नोंदविला असून ग्रामीण भागात शिक्षक म्हणून कार्यरत असताना आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले नैसर्गिक क्रीडा प्रतिभा वाढीस लागावी.
तसेच प्राथमिक स्तर पासुन विद्यार्थ्यांना निरोगी राहण्यासाठी नियमित योग करण्याची सवय अंगी लागावी यासाठी विद्यार्थ्यांसाठी योग स्पर्धा घेण्याचा मानस व्यक्त केला असुन 
ग्रामीण भागात शिक्षक म्हणून कार्यरत असताना आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली नैसर्गिक उपजत क्रीडा प्रतिभा वाढीस लागावी यासाठी 
धनेर बीटा च्या विस्तार अधिकारी सुनिता भामरे तसेच रोहोड चे केंद्र प्रमुख ध वा बागुल यांचे मार्गदर्शन खाली प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment