Tuesday, 25 February 2025

जेष्ठ सहकारी शिक्षक काशिनाथ मणुरे सर यांचा प्रामाणिकपणा सापडलेले सोन्याचे साडेतीन तोळ्याचे गंठण दिले परत

के.एल.ई. सोसायटी संचलित सिल्व्हर ज्यूबिली हायस्कूल,बार्शी येथे कार्यरत असणारे जेष्ठ शिक्षक तथा आमचे सहकारी श्री.काशिनाथ मणुरे सर ( काका ) हे रविवारी 23.02.2025 सुट्टी निमित्त जेऊर येथे गावाकडे गेले होते,शेतावरून परतत असताना त्यांना रस्त्यामध्ये निर्मनुष्य ठिकाणी पर्स पडल्याचे निदर्शनास आले,

सायंकाळची वेळ असल्याने कोणाची तरी चुकून पडल्याचे त्यांना वाटले त्यासाठी त्यांनी त्याच ठिकाणी अर्धा ते एक तास त्यांची वाट पाहिली.

सदर पर्स उघडले असता,त्यामध्ये साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण अंदाजे किंमत 3 लाख रुपयाचे होते.
त्या पर्समध्ये एका ऑटोमोबाईल दुकानदाराचा नंबर मिळाला.
त्या ठिकाणची सर्व हाकिकत त्या दुकानदाराला सांगितले व समोरच्या व्यक्तीकडून सर्व गोष्टींची खातरजमा करून घेतली.

त्या व्यक्तीकडून समजली की त्याची बहीण कार्यक्रमासाठी आली असता तिचे पर्स रात्रीच्या वेळेस गाडीवरून जाताना पडली प्रशांत आवटे हद्राळ (ता. अक्कलकोट) यांच्या सध्या पुणे येथे राहणाऱ्या बहिणीचे असल्याचे समजले.

त्यांच्या भावाने बहिणीला कॉन्फरन्स मध्ये घेऊन सरांशी बोलणे केले सरांनी पर्समध्ये असलेल्या वस्तूंची वर्णन करण्यास सांगितले असता त्याच प्रकारचे सर्व वस्तू आढळल्याने ती वस्तू त्यांनी परत केली..
आपले हरवलेले वस्तू योग्य व्यक्तीला देऊन माणुसकी जपणाऱ्या व पेशाने शिक्षक असलेल्या श्री.काशिनाथ मणुरे सर यांना सापडल्याने हरवलेली वस्तू आपल्याला  प्रामाणिकपणे मिळाल्याची भावना व्यक्त केली.
काशिनाथ मणुरे 9403470883 सरांच्या प्रामाणिकपणाचे सोलापूर जिल्ह्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे..

नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी श्री.अनिल बनसोडे साहेब त्याचबरोबर पर्यवेक्षक शिंदे साहेब
हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.प्रशांत कोल्हे सर,उपमुख्याध्यापक श्री अनिरुद्ध चाटी सर, सर्व सहकाऱ्यांनी त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक केले.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ चरणी लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी खूप लांबून येतात.
मी सुद्धा एक स्वामी भक्त आहे,स्वामिनीच मला ही वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संधी दिली.
जे कोणी अडचणीत असतील त्यांना नक्कीच मदत करा..
श्री काशिनाथ मणुरे सर
अक्कलकोट

No comments:

Post a Comment