Friday, 7 February 2025

शिक्षक सेनेचे मुंबईत महाअधिवेशन जुनी पेन्शन योजनेसोबतच अठरा विषयांवर होणार चर्चा

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
शिक्षकांच्या प्रश्नांवर मुंबई येथे ता.दहा फेब्रुवारी रोजी शिक्षक सेनेचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनासाठी शासनाने शिक्षकासाठी एक दिवसाची विशेष रजा मंजूर केली आहे.

तरी जास्तीत जास्ती संख्येने या अधिवेशनात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाध्यक्ष शरद हुडगे यांनी केले आहे.

मुंबईतील मुलुंड येथे हे महाअधिवेशन होत आहे.
या महाअधिवेशनात

🔴जुनी पेन्शन योजना लागू करावी,
🔴विषय शिक्षक यांना सरसकटपणे वेतनश्रेणी लागू करावी,
🔴शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी,
🔴कंत्राटी शिक्षक धोरण रद्द करावे,
🔴जिल्हा परिषदेचा प्रभारी कारभार बंद करून 🔴शिक्षणाधिकारी पदे,
🔴उपशिक्षणाधिकारी पदे,
🔴गटशिक्षणाधिकारी पदे तत्काळ भरावीत,
🔴न्याय प्रविष्ट प्रकरण संपवून विभागीय परीक्षाद्वारे केंद्र प्रमुख पदे तत्काळ भरावीत,
🔴२४ वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना सरसकटपणे 🔴वेतनश्रेणी लागू करावी,
🔴आम्हाला शिकवू द्या,
🔴अशैक्षणिक कामे व दैनंदिन शालेय
🔴टप्पा कामे बंद करावा,
🔴महाराष्ट्रातील सर्व शाळांना सरसकट वीज जोडणी करून बारा तास सेवा देण्यात यावी,
🔴महाराष्ट्रातील सर्व शाळांना वायफायची सुविधा देण्यात यावी,
🔴सातव्या वेतन आयोगाच्या वेतनत्रुटी दूर करून वेतनश्रेणीचे नवीन आदेश देण्यात यावे,
🔴ता. १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासननिर्णय रद्द करावा,
🔴रजा रोखीकरण सर्व शिक्षकांना सरसकटपणे लागू करावे आदी मागण्यांवर चर्चा होणार आहे.

तरी,या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन हुडगे यांनी केले आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

No comments:

Post a Comment