Thursday, 5 December 2024

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आता 'टार्गेट पीक ॲप'च्या माध्यमातून कसून सराव

शिक्षण विभागाच्या वतीने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून 'टार्गेट पीक ॲप' सुरू करण्यात आले आहे.
या ॲपचा विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी खूप फायदा होत आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕👇टार्गेट पीक ॲप लिंक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

विशेष नाममात्र फी
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सध्या ॲपच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांतील सुमारे आठ हजार विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत;तसेच दिवसेंदिवस या ॲपवर विद्यार्थ्यांची नोंदणी वाढत असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या फेब्रुवारीत पाचवी आणि आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे.
पाल्यांना या परीक्षेत चांगले यश मिळावे,यासाठी पालक खासगी शिकवणी लावतात.
मात्र,आता शिक्षण विभागानेही त्यासाठी आहे.
शिष्यवृत्ती करण्यासाठी आणि परीक्षेचा सराव व्हावा,शिष्यवृत्ती परीक्षेला शाळांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट व्हावेत,पालकांमध्येसुद्धा जागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सीईओ विकास मीना यांच्या
मार्गदर्शनाखाली ऑनलाइन 'टार्गेट पीक ॲप' उपलब्ध दिले आहे.
विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दररोज सायंकाळी सहा ते सातदरम्यान इयत्ता पाचवीसाठी,तर सात ते आठ या वेळेत इयत्ता आठवीसाठी ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करत आहेत;
तसेच परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांना सराव पेपर या ॲपवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
याचाही विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

No comments:

Post a Comment