Wednesday, 25 December 2024

सोलापूर जिल्हा सन २०२४ मधील स्थानिक सुट्टया जाहीर करणेबाबत....अखेर वेळ अमावस्या ची सुट्टी जाहीर

शिक्षण विभाग प्राथमिक
सोलापूर जिल्हा सन २०२४ मधील स्थानिक सुट्टया जाहीर करणेबाबत.

संदर्भ:- १. या कार्यालयाकडील पत्र जाक्र. जिपसो / शिक्षण / प्राआ-७/४९२/२०२४ दि.११/६/२०२४
२. या कार्यालयाकडील पत्र जाक्र. जिपसो/ शिक्षण / प्राआ-७/६०६/२०२४ दि.०७/८/२०२४
३.मा. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांचेकडील पत्र जा.क्र. मह / आस्था-१/प्र.क्र. ७४ (२०२२) आरआर / १५५१ सोलापूर दि.२८/१०/२०२४
उपरोक्त संदर्भ क्र. १ अन्वये सन २०२४-२५ मधील सुट्टया जाहीर करणेत आलेल्या आहेत. संदर्भ क्र.२ अन्वये दि.०९/०८/२०२४ रोजी नागपंचमी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. संदर्भ क्र. ३ अन्वये मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार
सोमवार दि.३०/१२/२०२४ रोजी वेळ अमावास्या सुट्टी जाहीर करणेत येत असून खालीलप्रमाणे सुट्टयामध्ये बदल करण्यात येत आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जाहीर केलेली सुट्टी
दि.३०/१२/२०२४ (वेळ अमावास्या)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
उन्हाळी सुट्टी सुधारित कालावधी
दि. ०४.०५.२०२५ ते १४.०६.२०२५
तरी याबाबत सर्व माध्यमाच्या जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरून अवगत करावे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सोलापूर
प्रतः- १) मा. जिल्हाधिकारी, सोलापूर जिल्हा माहितीसाठी सविनय सादर
२) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सोलापूर यांना माहितीस्तव सविनय सादर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

No comments:

Post a Comment