आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेत आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचा आदेश मागे घेतला असून आता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा करण्यात आली आहे.
तसेच इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे.
मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (Right to Education Act) विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास करता येत नव्हते.
पण आता नवीन शिक्षण धोरणानुसार आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचा निर्णय बदलण्यात आला आहे.
नापास विद्यार्थ्यांना पुन्हा संधी -
राज्यात शालेय शिक्षणासाठी शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा२०११मध्ये सुधारणा केली आहे. पाचवी आणि आठवी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेचा विद्यार्थ्याला पर्याय असणार आहे. पुनर्परीक्षेतही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण झाल्यास इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गातच त्या विद्यार्थ्याला ठेवले जाणार आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
पाचवी ते आठवीसाठी ढकलगाडी बंद ठळक मुद्दे --
▪️पाचवी पुढील नापास धोरण केंद्राकडून रद्द.
▪️नापास विद्यार्थ्यांना प्रमोट करणार नाही.
▪️केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय.
दोन महिन्यात पुन्हा एकदा द्यावी लागेल परीक्षा.
▪️आधी नापास विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलल जात होत.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाईल. सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.
याबाबत शासनाकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये लिहिलं आहे की, महाराष्ट्रराज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा,पुनर्परीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित करेल..
No comments:
Post a Comment