Saturday, 31 August 2024

शिक्षणाधिकारी ठाणे यांनी आयुक्त कार्यालयाला दिला दिशाभूल करणारा खोटा अहवाल


शिक्षण आयुक्त कार्यालयाचे फेर तपासणी बाबत आदेश

रा.फ. नाईक वि‌द्यालयातील मुख्याध्यापक यांनी शासनाची बेकायदेशीर आर्थिक फसवणूक केल्या बद्दल तसेच त्यांनी शासनाला खोटी माहिती देऊन वयक्तिक मान्यता मिळवल्या बद्दल अशा नऊ गंभीर मुद्द्द्यावर तक्रार करण्यात आलेली होती. शिक्षणाधिकारी ठाणे यांनी सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती गठित केली होती. कशी समितीने शाळेत भेट देऊन आणि अभिलेखाची तपासणी करून कार्यरत मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांना तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक रोजी च्या पत्रा‌द्वारे अहवाल मागणी केली. तक्रारीच्या अहवालामध्ये श्री पाटील यांनी वस्तुनिष्ठ अहवाल देत गंभीर तक्रारीतील नमूद गोष्टी घडल्याची पुष्टी देत दिनांक रोजी शिक्षणाधिकारी याना अहवाल सादर केला. सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समितीने मुख्याध्यापक आणि सत्य दिलेला अहवालाकडे दुर्लक्ष करून केराच्या टोपलीत टाकत बेकायदेशीर कृत्याला झाकणारा व अनियमित दिसत असून देखील सर्व काही नियमत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत खोटा अहवाल बनवण्यात आला. याचा सदर अहवाल 31/10/2024 रोजी चौकशी समितीने मा. शिक्षणाधिकारी यांना सादर केला. सदर अहवाल तक्रारदारास अ‌द्यापही उपलब्ध करून दिलेला नाही. याचा अर्थ श्री. थळे आणि शिक्षण विभागातील पदाधिकारी यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची दाट शक्यता आहे त्या शिवाय मुख्याध्यापक यांचा विसंगत असताना देखील खोटा अहवाल बनवला गेला. तक्रारदार लहू रामदास ढवळे हे त्याच शाळेतील कर्मचारी असल्याने ज्या मुख्याध्यापकानी आगोदर थळे
यांनी या गंभीर कृती केल्याचा अहवाल दिला तेच श्री. थळे यांच्यावर अन्याय झाला म्हणून तक्रारदारास मेमो देत आहेत या वरून थळे यांच्यात आणि कार्यरत मुख्याध्यापक यांच्यामध्ये ही आर्थिक देवाण घेवाण झाल्याची शंका निर्माण होत आहे. तक्रारदाराच्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांनी अहवाल पाठवण्याबाबत शिक्षणाधिकारी यांना दिनांक रोजी पत्र दिले या पत्राच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी यांनी आयुक्त कार्यालयास सादर केला परंतु सादर केलेल्या अहवालाची शिक्षण आयुक्त कार्यालयाने पडताळणी केली असता सादर केलेल्या अहवालामध्ये विसंगती आढळून आल्याचे 12 ऑगस्ट 2024 च्या पत्राद्वारे शिक्षण अधिकारी यांना कळवले व तसेच फेर तपासणी अहवाल सादर करण्याबाबत आदेशित करण्यात आले. खोटा व दिशाभूल करणारा अहवाल सादर केल्याब‌द्दल माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने शिक्षण आयुक्त शिक्षण सचिव संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन देणार असल्याचे म्हटले आहे.

No comments:

Post a Comment