▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे.
येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत.
बुधवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे. मात्र,तीन तास उलटूनही शाळा प्रशासनाकडून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही.
या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद राहिल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांची तक्रार दाखल करुन घेतली नव्हती.
त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता,याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
ABP
शाळा प्रशासनाकडून केवळ एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
शाळेचे संचालक किंवा अन्य कोणीही पालकांसमोर आलेले नाही.
Badlapur Crime: देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे.
येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि काही नागरिकांनी बदलापुरात रेल रोको केला. बदलापूर रेल्वे स्थानकात मुंबईकडे जाणारा मार्ग रोखला.
आज सकाळपासून बदलापुरातील रिक्षा सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🟣पालकांचा संताप का?
घटना समोर आली तेव्हा शाळेच्या संचालक मंडळाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला
शाळेची बदनामी होईल या भीतीने संचालक मंडळाने काही कारवाई केली नाही असा पालकांचा आरोप
संचालक मंडळातील काही पदाधिकाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही पालकांचा आरोप
शाळा प्रशासन निवेदन घ्यायला समोर येत नसल्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.
कारवाई करण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी संचालक मंडळ आणि मुख्याध्यापकांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे अखेर त्यांना निलंबित करण्यात आले आहे
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🟣बदलापूरच्या नामांकित शाळेत चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण, पालकांना 12 तास ताटकळत ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी-----
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती.
या दोन्ही मुली अवघ्या साडेतीन ते चार वर्षांच्या आहेत. त्यामुळे या घटनेबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शाळेसमोर हजारोंच्या संख्येने पालक,राजकीय मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन सुरु केले आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आले होते.
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन मुलींचे कंत्राटी सफाई कामगाराने शारीरिक शोषण केल्याने पालकवर्ग हादरला होता. या प्रकरणात अखेर 4 दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली असून शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित, तर वर्गशिक्षिका आणि आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. तर आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आला होता त्याच्यासोबतचा करारही शाळेने रद्द केला असून शाळेच्या सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे.
बदलापूर शहरातील एका जुन्या आणि नामांकित शाळेत हा संतापजनक प्रकार घडला होता.
यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं.
अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) हस्तक्षेपानंतर रात्री एक वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
यावरून पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. आज बदलापूर बंदची हाक दिली आहे आंदोलन सुरु असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🟣शाळेचा माफीनामा-------
या सगळ्या प्रकारानंतर शाळेकडून एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
यामध्ये म्हटले आहे की,घडलेला प्रकार दुर्दैवी,घृणास्पद आणि निंदनीय आहे. या प्रकारानंतर सबंधित आरोपी विरुद्ध कारवाई करण्यासाठी पूर्ण क्षमतेने संस्थेने पोलिसांना सहकार्य केले.
या घटनेनंतर सबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संस्थेचा आग्रह आहे,असे शाळेने निवेदनात म्हटले आहे.
पूर्व प्राथमिक आणि शिशु वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या आणि सांभाळ करण्याच्या दृष्टीने फक्त महिलांचीच नेमणूक केली जाणार आहे.
या प्रकरणात पालकांना झालेल्या मनस्तापाबद्दल संस्थेने त्यांची जाहीर माफी मागितली असून त्यांना कायदेशीर मदत देऊ केली आहे.
तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व पालक,विद्यार्थी आणि शहरातील सजग नागरिकांना संस्थेने शांततेचे आवाहन केले आहे.
कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी संस्था तयार असल्याचेही संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल यांनी सांगितले आहे.
ABP
🟣माफीनामा--------
बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला.
12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली.
या प्रकरणानतंर पीडित मुलीच्या कुटुंबाने 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली.
मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. यानंतर तक्रार नोंदवण्यात आली.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🟣मुख्य आरोपीला अटक----------
यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास करुन आरोपीला अटक केली.
अक्षय शिंदे असे या आरोपीचे नाव आहे.
तो 24 वर्षांचा असून या शाळेतील सफाई कर्मचारी म्हणून तो काम करत होता.
🟣शाळेच्या गेटवर पालकांची मोठी गर्दी--------
हे प्रकरण इतकं संवेदनशील असतानाही बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकानी गुन्हा दाखल करण्यासाठी 12 तासांचा अवधी घेतला.
शिवाय शाळा प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पालकांनी मंगळवारी सकाळी आक्रमक होत शाळेला जाब विचारण्यासाठी शाळेच्या गेटवर मोठी गर्दी केली आहे.
शाळा प्रशासनाने येऊन आमच्याशी बोलावं अशी पालकांची मागणी आहे. त्याचबरोबर आज नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे,या बदलापूर बंदमध्ये रिक्षा चालक, व्यापारी संघटना,शाळा बस चालक देखील सहभागी झालेत.
घटनास्थळी सध्या पालक वर्ग शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आहेत.
🟣शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाची गरज आहेच...
शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाची गरज नाही,असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱ्या शिक्षण संस्थेने व्यक्त केले आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश केल्यास त्याचा मुलांवर नकारात्मक,वाईट परिणाम होईल असे मत ‘शिक्षा संस्कृती उत्थान न्यास’ने (एसएसयूएन) व्यक्त केलेे. संघाचे प्रचारक दीनानाथ बत्रा यांनी स्थापन केलेल्या एसएसयूएनने शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये लैंगिक शिक्षणाच्या समावेशाऐवजी मुले,पालकांच्या समुपदेशनाची गरज असल्याचे म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर मधुरिमाच्या या विचारमंचावर व्यक्त झालेली मते...
लैंगिक शिक्षण ही संज्ञा कामजीवन, प्रजनन आणि गुप्तांगांबद्दल दिलेल्या माहितीसाठी वापरली जाते.
लैंगिक शिक्षणात नुसती एखादी शरीराच्या भागाची माहिती करून घेणे अभिप्रेत नाही,तर त्या अनुषंगाने होणाऱ्या भावनिक बदलांशी जुळवून घ्यायला शिकवणे,भावभावनांच्या आंदोलनांना संयमित करायला शिकणे या गोष्टीही येतात.
लैंगिकतेशी संबंधित विचार ‘विवेकपूर्ण’ बनवणे अभिप्रेत आहे. पालक,मोठी भावंडे,शिक्षणसंस्था आणि वैद्यकीय संस्था हा या प्रकारचे शिक्षण देण्याचा एक योग्य मार्ग समजला जातो.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🟣लैंगिक शिक्षण देण्याची गरज का आहे?
लैंगिक शिक्षण ही संज्ञा कामजीवन, प्रजनन आणि गुप्तांगांबद्दल दिलेल्या माहितीसाठी वापरली जाते.
लैंगिक शिक्षणात नुसती एखादी शरीराच्या भागाची माहिती करून घेणे अभिप्रेत नाही,तर त्या अनुषंगाने होणाऱ्या भावनिक बदलांशी जुळवून घ्यायला शिकवणे,भावभावनांच्या आंदोलनाना संयमित करायला शिकणे या गोष्टीही येतात----
🍁१)भारतासारख्या उष्ण कटिबंधात मुले-मुली पौगंडावस्था (वयात येण्याचे) वय हळूहळू कमी होत चालले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी मुलीला मासिक पाळी सुरू झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत.
या वयात मुलीचे शरीर तयार होत असले तरी तिचे मन एका बालिकेचेच असते. तिला तिच्यात होणाऱ्या बदलांची योग्य ती जाणीव करून देणे आवश्यक आहे.
🍁२)आता शालेय वयापासून मुलं-मुली हे स्मार्टफोन, इंटरनेट वापरतात.
विशेषतः इंटरनेटवर अक्षरशः लाखोंच्या संख्येने उपलब्ध असणारी पोर्नोग्राफिक संकेतस्थळे आणि त्यातून दाखवली जाणारी लैंगिक विकृती, भारतात अगदी सहजासहजी उपलब्ध असणारे लैंगिक साहित्य आणि पोर्नोग्राफिक फिल्म्स यांच्या नकारात्मक परिणाम मुलांवर होऊ नये म्हणून त्यांना निकोप कामजीवनाची ओळख,स्वत:च्या शरीराची ओळख शाळेतच करून दिली पाहिजे.
तसेच समाजात बलात्कार,लैंगिक आत्याचाराच्या घटना, अल्पवयीन मुलींना वैश्याव्यवसाय करायला लावणं,अशा अनेक घटना घडतात. यामागे अनेक कारणं आहेत, पण एक महत्त्वाचं कारणं,ते म्हणजे ‘लैंगिक शिक्षणा’चा अभाव !
🍁३)मुलांना शाळेत पचनसंस्था, मज्जासंस्था वगैरेंसोबत मानवी प्रजननासाठी उपयुक्त ठरणारे अवयव, कार्य इत्यादींवरही एक धडा आहे. पण केवळ मुलांच्या वा केवळ मुलींच्या शाळेमध्ये ह्या धड्यातील काही भाग शिक्षक शिकवतात.
परंतु, पचनसंस्था वा मज्जासंस्थेवरील धडा जेवढा खोलात जाऊन शिकवला जातो,तेवढाच प्रजनन संस्थेची माहिती देणारा धडा वरवर शिकवला जातो. मुले-मुली एकत्र असलेल्या शाळांत शिक्षक/शिक्षिकांना अत्यंत अवघडल्यासारखे वाटल्यामुळे अनेकदा हा धडा न शिकविण्याकडेच कल दिसून येतो.
तसेच ह्या धड्यावर एकही प्रश्न परीक्षेत विचारला जात नाही.
हा विषय वगळून इतर धड्यांवर भर देणे सहज शक्य होते.
मात्र हा स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासक्रमामध्ये घेतला तर तो वगळणे शक्य होणार नाही आणि खात्रीपूर्वक शिकवला जाईल.
दिव्य मराठी
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
घडलेली घटना खूप निंदनीय आहे,अशा हरामखोरांना भर चौकात फाशी दिली पाहिजे.
पालकांचा हा राग नक्की अनावर व्हायलाच पाहिजे आरोपीला अटक करण्यात हलगर्जीपणा,शाळाचा सीसीटीव्ही बंद,प्रकरण दडपण्याचा प्रयत्न या खरच संशयास्पद गोष्टी आहेत.
अशा घटना जर शाळेत होत असतील तर आपल्या पेशेवरील,शाळेवरील संस्था वरील सर्वांचा विश्वास उडून जाईल.
शिक्षकांना आई-वडील यांच्यानंतर दुसरे आई-वडील म्हणजे शिक्षक असे म्हणतात,त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये,मग आरोपी कोणीही असो त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
आपले पोलीस प्रशासन आजवर योग्य ती कारवाई करत जनतेचा विश्वास संपादित केला आहे.
या प्रकरणात देखील सर्व दोषींवर नक्कीच कारवाई करतील अशी इच्छा........पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याची वागणे बदलले तर तात्काळ त्यांना बोलते करावे.
विद्यार्थी हा शिक्षक प्रिय असतो ते प्रत्येक गोष्टी आपल्या शिक्षकांना लगेच सांगत असतात.
कोणतेही शंका आल्यास पालक स्वतःवर्ग शिक्षकांशी संपर्क साधून या विषयावर चर्चा केली पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना गुड-टच,बॅड-टच याविषयी मुलांसोबत बोललं पाहिजे...
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
राहुल शकुंतला दत्तात्रय म्हमाणे
उपक्रमशील शाळा पुरस्कृत
प्राथमिक विद्या मंदिर बार्शी
No comments:
Post a Comment