महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) उद्या (२१ मे) बारावीचा (Hsc) निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
२१ मे मंगळवारी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
मागील कित्येक दिवसांपासून विद्यार्थ्यांना या निकालाची प्रतिक्षा होती.
अखेर उद्या निकालाची प्रतिक्षा संपणार आहे.
या संदर्भात नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
या परिपत्रकात निकालासंदर्भात आणि गुणपडताळणीच्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, मंगळवारी निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिकेची पडताळणी देखील करता येणार आहे. त्यासाठीची माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. ऑनलाईन निकालानंतर इयत्ता १२ वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी करता येईल.
त्यासाठी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती (झेरॉक्स कॉपी) पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मागवता येतील.
त्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in)
विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करता येईल,किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ही अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
यासाठी आवश्यक अटी आणि सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
गुणपडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार,दिनांक २२/०५/२०२४ ते बुधवार,दिनांक ०५/०६/२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल.
⚫निकाल कसा डाऊनलोड करायचा?
mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या .
मुख्यपृष्ठावर, 'महाराष्ट्र एचएससी निकाल 2024' लिंकवर क्लिक करा.
दिलेल्या फील्डमध्ये विद्यार्थ्याचा रोल नंबर, आईचे नाव टाका.
ते सबमिट करण्यासाठी 'पहा निकाल' बटणावर क्लिक करा.
ऑनलाइन mahresult.nic.in 2024 बारावीचा निकाल स्क्रीनवर दर्शविला जाईल,
पुढील संदर्भासाठी महाराष्ट्र HSC निकाल 2024 चा प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट घ्या.
mahresult.nic.in वर तुम्ही महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल ऑनलाइन पाहू शकता.
याशिवाय,विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या इतर वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात.
खाली वेबसाइट्सची यादी आहे जिथे तुम्हाला महाराष्ट्र 12वीचा निकाल 2024 मिळू शकेल.
याव्यतिरिक्त खालील दिलेल्या लिंक वर टच करून सुद्धा आपला निकाल पाहता येईल.
बारावीचा निकाल 2024 कसा तपासायचा?
HSC Board Exam Result 2024 Result
Steps to check Maharashtra HSC result in 2024 online:
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⚫SMS द्वारे निकाल--
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2024 एसएमएसद्वारे
महाराष्ट्र 12वीचा निकाल 2024 एसएमएसद्वारे पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी दिलेल्या फॉरमॅटमध्ये एसएमएस टाइप करणे आवश्यक आहे.
बारावीचा निकाल 2024 महाराष्ट्र बोर्ड तपासण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा.
या फॉरमॅटमध्ये एसएमएस टाइप करा:
MHHSCSEAT नं.
57766 वर पाठवा.
महाराष्ट्राचा बारावीचा निकाल 2024 त्याच क्रमांकावर एसएमएस पाठवला जाईल.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
No comments:
Post a Comment