Friday, 24 May 2024

अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू

प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू
अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया येत्या शुक्रवारी (ता. २४) सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होईल.

या दिवसापासून अर्ज प्रमाणित करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
 यंदा तीन नियमित फेऱ्या आणि दोन विशेष फेऱ्या होतील,अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आली.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये राज्यातील
 पुणे आणि पिंपरी चिंचवडसह
मुंबई महानगर क्षेत्र,
नाशिक,
अमरावती,
नागपूर महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांमधील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमार्फत होतील.
 त्यानुसार 'मॉक डेमो' नोंदणी अंतर्गत बुधवारी (ता. २२) आणि गुरुवारी (ता. २३) डमी अर्ज भरण्याचा सराव विद्यार्थी-पालक करू शकतील.
शुक्रवारपासून प्रत्यक्ष
कॅप' अंतर्गत प्रवेश प्रक्रियेचा कालावधी---
■ 'कॅप' अंतर्गत नियमित पहिली फेरी राज्य मंडळाच्या दहावीचा
निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होईल आणि ती १० ते १५ दिवस चालेल.

 त्यानंतर नियमित दुसरी फेरी आणि तिसरी फेरी प्रत्येकी सात ते आठ दिवस राबविण्यात येईल.

त्यानंतर दोन विशेष फेऱ्या होतील. प्रत्येक प्रवेश फेरीसोबत कोट्यांअंतर्गत प्रवेश समांतर
सुरू असतील.

त्यानंतरही आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशेष फेऱ्या,दैनंदिन गुणवत्ता फेऱ्या होतील.

 प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) ही फेरी यंदा होणार नाही.
■ इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी संकेतस्थळ : https://11thadmission.org.in/

प्रक्रिया सुरू होईल.
पहिली विशेष फेरी झाल्यानंतर महाविद्यालयांना अकरावीचे वर्ग सुरू करता येतील.

'मॉक डेमो' नोंदणीद्वारे पोर्टलवर डमी लॉगिन सुविधा असेल.
शुक्रवारपासून (ता. २४) पोर्टलवर प्रत्यक्ष अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध असेल.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕प्रवेश प्रक्रियेचा तपशील
कार्यवाहीचे टप्पे : कालावधी
■ विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष ऑनलाइन नोंदणी करणे,
अर्जाचा भाग एक भरणे,अर्ज प्रमाणित करून घेणे : २४ मे पासून सुरू (दहावीच्या निकालापर्यंत)

■ उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी : २२ मेपासून

■ 'कॅप' फेरीसाठी अर्जाचा भाग दोन भरणे, महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविणे : दहावीचा निकालानंतर सुरू
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕नेमकी कशी असेल प्रवेश प्रक्रिया--
सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतून माहिती अकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका घेऊन त्यात दिलेल्या पासवर्ड आणि लॉग इन आयडीद्वारे 
 या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करायचे आहे.

त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती रजिस्ट्रेशन फॉर्म भाग - 1 मध्ये टाईप करून ती सेव्ह करायची आहे.
यानंतर ज्यावेळी दहावीचा एसएससी निकाल लागणार त्यानंतर या रजिस्ट्रेशन फॉर्म भाग 2 भरायचा आहे.

भाग 2 मध्ये दहावीचे मार्क्स त्यासोबतच जास्तीत जास्त दहा कॉलेजचे पसंती क्रमांक विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी द्यायचे आहेत.

प्रवेशाच्या पहिल्या फेरीत पहिल्या क्रमांकाचे कॉलेज विद्यार्थ्याला मिळाल्यावर त्याला ते घेणे बंधनकारक असणार आहे.
 बाकी विद्यार्थ्यांसाठी ते दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा कॉलेज पसंती क्रमांक देऊ शकतील.

हीच प्रक्रिया फेरी दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीसाठी होईल. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नसतील त्यांच्यासाठी तिसऱ्या फेरीनंतर स्पेशल फेरी घेण्यात येईल यामध्ये अल्पसंख्यांक कॉलेजच्या आरक्षित उरलेल्या जागा देखील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुल्या होतील.

यामध्ये विद्यार्थ्यांनी इंटेग्रेटेड कॉलेजला प्रवेश घेऊन नये, असे शिक्षण उपसंचालकांकडून सांगण्यात आलं आहे.
सायन्स, विज्ञान आणि कलाशाखा इथे अकरावीला प्रवेश घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात.
१) जन्म दाखला – नगर अथवा महानगरपालिकेचा जन्म दाखला.
२) शाळा सोडल्याचा दाखला.
३) शिधापत्रिका
४) वीजबिल
५) ओळखपत्र फोटोसहित
६) आधार कार्ड
७) १० वीचे सर्टिफिकेट
८ ) १० ची मार्कलिस्ट
९) विहित नमुन्यातील अर्ज
१०) ओरिजिनल हॉल तिकीट

No comments:

Post a Comment