Thursday, 20 March 2025

राज्यात सरकारी शाळांमध्ये देण्यात येणार CBSE चे शिक्षण;मंत्री मंडळाचा निर्णय

राज्यामध्ये सरकारी शाळांमध्ये CBSE चे शिक्षण देण्यात येणार आहे. मंत्री मंडळाने हा निर्णय घेतला आहे. हा नियम 2025-26 शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात आला आहे.
राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे,हा पॅटर्न येत्या 2025-26 शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याच्या उद्देशाने सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात विधानपरिषदेत माहिती दिली.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने या निर्णयासंदर्भात अधिकृत प्रक्रिया सुरू केली.
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुसे यांनी सांगितले की,राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP 2020) सीबीएसई अभ्यासक्रम स्वीकारला जाणार आहे.
यासाठी सुकाणू समितीने पाठ्यक्रमाच्या आराखड्याला मान्यता दिली आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण मिळावे,यासाठी सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीतही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच,नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात 1 एप्रिल 2025 पासून होईल.
राज्यातील शाळांमध्ये हा पॅटर्न प्रभावीपणे लागू करण्यासाठी शिक्षण विभागाने सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात,असे निर्देश सरकारने दिले आहेत.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि शिक्षण क्षेत्रातील पुढील पावले---
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. या बैठकीत त्यांनी शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्राला पुन्हा शैक्षणिक आघाडीवर आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे निर्देश दिले. शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा स्वीकार करावा, परंतु त्यात राज्याच्या गरजेनुसार आवश्यक बदल करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी कार्ययोजना तयार केली आहे. शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाबाबत प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
सीबीएसईच्या धर्तीवर लागू होणारा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांमध्ये दर दिवशी अध्यापनाचे पाच ते साडेसहा तास होणे आवश्यक आहेत.
सध्या पूर्ण वेळ किंवा दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांमध्ये हे प्रमाण चार ते साडेचार तास आहे.
त्यामुळे शाळांना शिकवण्यासाठी कमी वेळ मिळत आहे.
यामुळेच सुट्ट्या कमी करून हे तास भरून काढण्याचे नियोजन आहे.
⭕या आहेत शिफारशी---
🔹नवीन शैक्षणिक वर्ष १ एप्रिलला सुरू,
🔹३१ मार्च रोजी वार्षिक परीक्षेच्या निकालाने समाप्त
🔹मे हा एक महिना उन्हाळी सुट्टी
🔹एक जूनपासून पुन्हा शाळा सुरू
🔹खूप दीर्घकालीन सुट्ट्या न देता शाळेतच अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू ठेवणे
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सुट्ट्या कमी का करणार?----
सीबीएसईच्या धर्तीवर लागू होणारा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांमध्ये दर दिवशी अध्यापनाचे पाच ते साडेसहा तास होणे आवश्यक आहेत.
सध्या पूर्ण वेळ किंवा दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांमध्ये हे प्रमाण चार ते साडेचार तास आहे.
त्यामुळे शाळांना शिकवण्यासाठी कमी वेळ मिळत आहे.
यामुळेच सुट्ट्या कमी करून हे तास भरून काढण्याचे नियोजन आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सीबीएसई (CBSE) म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, जी भारत सरकारची माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची एक नियामक संस्था आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) | भारत विज्ञान, तंत्रज्ञान आणि .... 
⭕सीबीएसई पॅटर्नची मुख्य वैशिष्ट्ये:
अभ्यासक्रम:
CBSE देशभरात प्रमाणित अभ्यासक्रम,मूल्यांकन आणि परीक्षा देते. 
परीक्षा:
इयत्ता 10वी आणि 12वीच्या वार्षिक परीक्षा आयोजित करते. 
स्वायत्तता:
ही एक स्वायत्त संस्था आहे जी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करते. 
उद्दिष्ट्ये:
देशातील आणि बाहेरील संलग्न संस्थांना मदत करणे, अभ्यासक्रम अद्ययावत करणे आणि डिझाइन करणे. 
नवीन पॅटर्न:
2024-25 च्या CBSE बोर्ड परीक्षेच्या पॅटर्नमध्ये क्षमता-आधारित प्रश्नांचा समावेश आहे, जे परीक्षेच्या किमान 30% असतात. 
मूल्यांकन:
हे प्रश्न विद्यार्थ्यांची समज, अनुप्रयोग आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचे मूल्यांकन करतात. 
प्रश्नांची रूपे:
ते विविध स्वरूपे घेऊ शकतात, ज्यात बहुपर्यायी प्रश्न (MCQ) आणि केस-आधारित प्रश्न समाविष्ट आहेत. 
नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार:
2024-25 च्या CBSE बोर्ड परीक्षेच्या पॅटर्नमध्ये ५०% क्षमता-आधारित प्रश्न, २०% बहु-निवड प्रश्न (MCQ) आणि ३०% लघु आणि दीर्घ-उत्तरी प्रश्नांचा समावेश आहे. 
महाराष्ट्रात सीबीएसई पॅटर्न:
महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये आता CBSE पॅटर्न लागू करण्यात येणार आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम प्रचंड वाढला आहे. आता राज्यातील बोर्डाच्या मुलांना सीबीएसई,आयसीएसई बोर्डाच्या मुलांसोबत स्पर्धा करावी लागते.
हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर सक्षम करण्यासाठी वार्षिक वेळापत्रकात हे बदल करण्यात येणार आहेत.
राहुल रेखावार,संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
राज्यात विदर्भ,मराठवाडा या भागात एप्रिल महिन्यात प्रचंड उन्हाळा असतो.
त्या काळात शालेय विद्यार्थ्यांना शाळेसाठी बाहेर पाठवणे अव्यवहार्य आहे;तसेच या आराखड्याबाबत सरकार शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांशी चर्चा करील.
त्या चर्चेत आम्ही आमचे मुद्दे समोर ठेवूच.
शालेय सुट्ट्या,विद्यार्थ्यांच्या तासिकांबाबत एवढा मोठा बदल आवश्यक नाही.
- अनिल बोरनारे.
अध्यक्ष,मुंबई मुख्याध्यापक संघटना,उत्तर विभाग
महाराष्ट्र टाइम्स

No comments:

Post a Comment