Friday, 14 March 2025

सस्नेह निमंत्रण पद्मश्री अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक १६ मार्च रोजी "इको फ्रेंडली"रंगपंचमीचे आयोजन

सस्नेह निमंत्रण..
पद्मश्री अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या उपस्थितीत आपल्या संकुलात रविवारी 'इको फ्रेंडली' रंगपंचमीचे आयोजन
🔸🔹🔶🔷🔸🔹🔶🔷🔸🔹🔶🔷🔸🔹🔶🔷 
रंग साठले मनी,
नभी त्यांना उधळू चला.
 सर्व बाल चिमुकल्यांना व तरुण पिढीला आदर्श  पद्मश्री अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या भेटीची सुवर्णसंधी
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
गत दोन वर्षांपासून नैसर्गिक रंगांची पर्यावरणपूरक टिळा होळी, पाण्याचा अपव्यय टाळत अबीर गुलालाची उधळण करीत,
त्वचेची काळजी,डोळ्यांची निगा इ. बाबत जनजागृती करीत आरोग्यदायी रंगपंचमी साजरा करण्याचा तसेच नव्या पिढीपुढे आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यावर्षी रंगपंचमी दिनांक १९ मार्च २०२५ रोजी आहे तत्पूर्वी म्हणजेच,रविवार दिनांक १६ मार्च २०२५ रोजी,सकाळी ९:०० वा. पर्यावरणपूरक पद्धतीने हा सण साजरा करण्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सोलापूरचे बँड अॅम्बेसेडर पद्मश्री अरण्यऋषी मा.मारुती चित्तमपल्ली यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे.
🔴🟠🟡🟢🔵🟣⚫⚪🔴🟠🟡🟢🔵🟣⚫⚪
चला शोधूया! "इको-फ्रेंडली लिव्हिंग" 

झाडे लावणे यासारख्या पर्यावरणाला मदत करणाऱ्या इतर क्रियांची ओळख करून देताना,विस्तृतपणे,जीवनशैलीशी जुळवून घेणे आणि निसर्गात टिकून राहणाऱ्या आणि हवा तसेच प्रदूषण आणि जलचर आणि वनजीवनाला होणारे नुकसान कमी करणारे जीवन निवडणे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
ज्येष्ठ नागरिक संघटना संयुक्त शिखर (समन्वय) समितीच्या माध्यमातून 
🔹सोलापुरातील तमाम ज्येष्ठ नागरिक संघटनांचे प्रतिनिधी,
🔹सामाजिक वनीकरण विभाग,सोलापूर विकास मंच,
🔹हेरिटेज मणिधारी सांस्कृतिक मंडळ आपला सहभाग नोंदवणार आहे. तसेच
🔹मा.मोनिका सिंह (उपजिल्हाधिकारी, सोलापूर)
🔹मा.तैमूर मुलाणी (उपायुक्त, सोमपा), मा. निलेश पाटील (तहसीलदार, उ. सोलापूर),
🔹मा.विशाल चव्हाण (सोलापूर वनविभाग),
🔹मा.गजानन होनराव (अध्यक्ष, हेरिटेज मणिधारी सांस्कृतिक मंडळ),
🔹मा.योगीज गुर्जर (सोलापूर विकास मंच),
🔹मा.महादेव माने (शासकीय संनियंत्रक समिती सदस्य) इ. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या उपक्रमास आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे.
तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय...
⭕कार्यक्रम स्थळः हेरिटेज मणिधारी एम्पायर,सूत मिल कंपौड-उद्यान, अक्कलकोट रोड सोलापूर.

⭕आपले विनित:-
🔹ज्ये.ना. संघ. संयुक्त शिखर समिती, सोलापूर आयोजक

🔹आदर्श जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ संयोजक
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
RDM_SMS

No comments:

Post a Comment