सोलापूर, ता. ५ : उन्हाळ्यामुळे
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सोमवारपासून (ता. १०) सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत भरविण्यात येणार आहेत.
मात्र,ती एक तासाने कमी करून ११.३० पर्यंत भरविण्याची मागणी शिक्षक संघाने केली आहे.
बुधवारी (ता. ५) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाढत्या उन्हामुळे १ मार्चपासून जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात
भरविण्याची मागणी सर्वच शिक्षक संघटनांनी केली होती. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी
यांच्या आदेशानंतरच सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख
यांनी घेतली होती. बुधवारी झालेल्या बैठकीत १० मार्च ते२ मे या कालावधीत सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी शेख यांनी याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बैठकीतही त्यांना सूचना दिल्या.
पूर्वी उन्हाळ्यात सकाळी ७.३० ते ११.३० पर्यंत शाळा भरवल्या जात होत्या. मात्र, यंदा ती वेळ १२.३० पर्यंत केली आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारपर्यंतची वेळ विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक असल्याचे शिक्षक संघाने म्हटले आहे.
सकाळ
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕दरवर्षी जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये १ मार्च पासून सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत शाळा भरविल्या जायच्या. मात्र,यंदा ती वेळ १२.३० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खरे तर ही वेळ सकाळी ११.३० पर्यंतच ठेवायला हवी होती.
कारण जिल्ह्यातील उन्हाची तीव्रता लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक आहे.
🍁अनिरुद्ध पवार,
जिल्हाध्यक्ष,शिक्षक संघ,सोलापूर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕🔥🔥🔥राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची सोलापुरात नोंद,तर सर्वात कमी तापमान नोंदवले पुण्यात
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
मुंबई : मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमानाचा पारा वाढत असून, बुधवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सोलापूर येथे ३८.२ अंश सेल्सिअस झाली आहे.
रविवार ते मंगळवार मुंबई महानगर प्रदेशात तापमान चढे नोंदविण्यात येईल,अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीच मुंबईला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला होता.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे तापमानात वाढ होत आहे.
६ ते १२ मार्चदरम्यान मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
पालघर,ठाणे,नवी मुंबई व कल्याणमध्ये ४० अंश तापमान नोंदविले जाईल.
मुंबईचा पाराही ३९ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
रविवार ते मंगळवार दरम्यान उन्हाचा तडाखा जास्त असू शकेल.
अश्रेया शेट्टी,
हवामान अभ्यासक
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕कुठे किती पारा?
▪️पुणे-३६.०
▪️सोलापूर-३८.२
▪️सांगली-३७.९
▪️रत्नागिरी-३७.५
▪️मुंबई-३७.४
▪️कोल्हापूर-३७.१
▪️सातारा-३६.२
▪️धाराशिव-३६.१
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
No comments:
Post a Comment