Monday, 13 January 2025

आरटीई' प्रवेशासाठी आजपासून करा अर्ज

शिक्षक हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यातील आठ हजार ५०२ शाळांमधील तब्बल एक लाख तीन हजार ७०८ जागांसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (ता. १४) सुरू होत आहे.

पालकांना https://student. maharashtra.gov.in/

adm_portal या लिंकवर अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी २७ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. विद्यार्थ्यांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महापालिका (स्वयंअर्थसहाय्यित शाळा) यामध्ये प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव आहेत.
या राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२५- २६ करिता विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे---
▪️निवासी पुरावा

▪️जन्मतारखेचा पुरावा

▪️जातीचा दाखला

▪️आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होत आहे,अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
पालकांसाठी सूचना----
■ आर्थिक वर्षात वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे

■ २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक १० शाळांची निवड करावी

■ अर्ज भरताना शाळेपासून घरापर्यंतचे हवाई अंतर गुगल मॅपने निश्चित करावे

■ प्रवेश प्रक्रियेबाबत काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर दिलेल्या मदत केंद्रांशी संपर्क साधावा

■ पालकांनी ऑनलाइन अर्ज करताना अचूक माहिती भरावी
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
खोटी माहिती भरल्यास प्रवेश रद्द-----
■ विद्यार्थ्यांनी खोटी, चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल,असा इशारा प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment