संदर्भ :- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२०२/ एस.डी.२ दि.२४/११/२०१७
संदर्भिय शासन निर्णयानुसार शास्त्रीय कला,चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येते.
सदर शासन निर्णयातील मुद्दा क्र. ०५ मध्ये याबाबतचे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळेकडे दि. १५ डिसेंबर अखेर व माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे सदरचे प्रस्ताव सादर करावयाची अंतिम तारीख १५ जानेवारी अशी नमूद आहे
तथापि शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२४ चा निकाल जानेवारी २०२५ च्या दुसन्या आठवडयात जाहीर करण्यात येणार असल्याने शास्त्रीय कला,चित्रकला व लोककला प्रस्ताव स्विकारण्याच्या मुदतीमध्ये वाढ करण्याबाबत विविध संघटनांनी या कार्यालयाकडे विनंती केली आहे.
त्याअनुषंगाने सदर प्रस्ताव स्विकारण्याच्या दोन्ही तारखांना खालीलप्रमाणे मुदतवाढ या वर्षासाठीच देण्यात येत आहे.
शासन निर्णयानुसार अंतिम दिनांक
वाढीव मुदतीसह सुधारित अंतिम दिनांक
१.विद्यार्थ्यांनी शाळेकडे प्रस्ताव सादर करणे----
⭕अंतिम---दिनांक १५ डिसेंबर
शुक्रवार ,
⭕मुदतवाढ--दि. २४ जानेवारी २०२५
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
२.शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करणे---
⭕अंतिम---दिनांक १५ जानेवारी
⭕मुदतवाढ---शुक्रवार,दि.३१ जानेवारी २०२५
तरी उपरोक्तनुसार सर्व विभागीय मंडळांनी योग्य ती कार्यवाही करावी. सदर मुदतवाढ आपल्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून देवून त्याप्रमाणे मुदतीत कार्यवाही करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचित करावे. तसेच आपल्या स्तरावरुन याबाबत प्रसिध्दी देण्यात यावी व कोणताही पात्र विद्यार्थी सदर गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी.
(देविदास कुलाळ)
सचिव,
राज्यमंडळ, पुणे-४.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
प्रत माहितीसाठी सविनय सादर-
१. मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-३२.
२. मा.आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे ४११ ००१.
३. मा.कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई - ०१
प्रत आवश्यक कार्यवाहीसाठी व्यवस्थापक, गणकयंत्र विभाग, राज्यमंडळ, पुणे.
No comments:
Post a Comment