Sunday, 29 September 2024

'माध्यमिक'च्या १५० शिक्षकांची मान्यता रद्द होणार?


अतिरिक्तांच्या समायोजनाला बगल; नवे नियमबाह्य, बीएड होण्यापूर्वीच चौघांना मान्यता

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला बगल देऊन तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी नव्या उमेदवारांना वैयक्तिक मान्यता दिल्याची बाब विद्यमान शिक्षणाधिकाऱ्यांच्या पडताळणीत समोर आली आहे.
 अंदाजे १३० ते १५० जणांना शासन नियम डावलून वैयक्तिक मान्यता दिल्या असून त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांना अहवाल पाठविला आहे.

शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देताना तो उमेदवार टीईटी उत्तीर्ण असावा, मान्यता देताना पवित्र पोर्टलद्वारे त्या उमेदवाराची निवड होणे अपेक्षित आहे.
याशिवाय

खासगी अनुदानित संस्थेने रिक्त पदाची जाहिरात द्यावी, उमेदवाराच्या मुलाखती घेऊन त्याचे गुणदान करून निवड यादी प्रसिद्ध करावी, निवड झालेल्या उमेदवाराचा संस्थेने ठराव
करून त्याला नेमणूक द्यावी, त्याच्या नियुक्तीचा ठराव शिक्षणाधिकाऱ्यास सादर करावा असे टप्पे आहेत.
 मात्र,अनेक वैयक्तिक मान्यतांमध्ये या टप्प्यांचे पालन करण्यात आलेले नाही.
चार
शिक्षकांना तर माघील तारखा टाकून मान्यता देण्यात आल्या असून त्या उमेदवारांचे चीएड शैिक्षणिक पात्रता) मान्यता दिल्यानंतर पूर्ण झाल्याचेही आढळून आले आहे. त्यांच्या मान्यता रद्द कराव्यात म्हणूनही
शिक्षणाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव उपसंचालकांना सादर केला आहे.

आता शिक्षण उपसंचालक स्तरावरून अशा गंभीर बाबींवर ठोस कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕चौकशी समितीने २९ जणांचा पाठविला अहवाल--
■ माध्यमिक शिक्षण विभागाकडील तक्रारीनुसार शिक्षण उपसंचालकांनी मागील
दोन शिक्षणाधिकाऱ्यांच्या काळातील ३३ जणांच्या वैयक्तिक मान्यतांची सखाल चौकशी करून त्याचा अहवाल चौकशी समितीकडे मागितला होता. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी त्यासंदर्भात माध्यमिक शिक्षण विभागाला पत्रव्यवहार केला, पण त्यांना अवघ्या २९ जणांचीच माहिती प्राप्त झाली. समितीने १५ दिवसांपूर्वी त्यांचा अहवाल उपसंचालकांना पाठविला असून त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही हे विशेष.

⭕अल्पसंख्याक शाळांना पदभरतीस मान्यता---
राज्यातील अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक पदभरतीवर निर्बंध घालण्यात आले होते. पूर्वीच्या शासन निर्णयानुसार अल्पसंख्याक शाळांना त्यांच्याकडील रिक्त पदांपैकी ५० टक्केच पदे भरता येत होती. पण, आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार त्या शाळांना रिक्त पदांच्या ८० टक्के पदभरतीस मान्यता मिळाली आहे. आता त्या निर्णयानुसार अंमलबजावणी होईल,
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
माध्यमिक शिक्षण विभागाकडील तक्रारीनुसार शिक्षकांच्या मागील काळातील वैयक्तिक
66 मान्यतांची पडताळणी झाली.
कागदपत्रे पडताळणीअंती काहींना मान्यता देताना शासन नियमाचे पालन झाले नसल्याचे आढळले आहे. त्यासंबंधीचा रिपोर्ट उपसंचालक कार्यालयास सादर केला असून चौघांना तर बीएड होण्यापूर्वीच मान्यता दिल्याचे आढळले आहे.
आता उपसंचालक स्तरावरून त्यासंदर्भात ठोस कारवाई होईल. - 
सचिन जगताप,
माध्यमिक शिक्षणाधिकारी,
सोलापूर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
तात्या लांडगे सकाळ सोलापूर

अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला;दफनविधी पूर्ण

अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला

ठाणे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटर झालेला आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरला 7 दिवस उलटूनही अद्याप त्याच्या अंत्यविधीसाठी जागा निश्चित झालेली नाही. राज्य सरकारने अक्षय शिंदेचा अंत्यविधी सोमवारपर्यंत करण्याची ग्वाही हायकोर्टात दिली असून आता अंत्यविधीसाठी फक्त आजचाच दिवस उरला आहे.
त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत अक्षय शिंदेचा (akshay shinde)अंत्यविधी राज्य सरकारला करावा लागणार आहे. त्यातच,आता उल्हासनगर (ulhasnagar) येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा अंत्यविधी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कारण,येथील स्मशानभूमीत पोलिसांकडून खड्डा खोदण्यात आला असून येथे त्याच्या मृतदेहाचे दफन केले जाईल.
त्यामुळे, गेल्या 6 दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत असलेल्या अक्षयच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार होणार असल्याचे निश्चित मानले जाते. 
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचं लोकांनी समर्थन केलं.
तर, समाजातील काही विचारवंत, वकील आणि राजकीय नेत्यांना हा एन्काऊंटर फेक असल्याचे सांगत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. तर, अक्षयच्या वडिलांनी याप्रकरणी न्यायालयात धावदेखील घेतली.
त्यामुळे,अक्षयच्या मृतदेहावरील अंत्यंस्कार हादेखील गुंतागुंतीचा विषय बनला.
त्यातच, शिंदे कुटुंबीयांच्या रितीरिवाजानुसार अक्षयचा दफनविधी करण्यास सरकारच्यावतीने कबुली दर्शवण्यात आली होती.
त्यामुळे, दफनविधीसाठी जागा शोधण्याचं काम पोलिसांकडून गेल्या 3 दिवसांपासून सुरू होतं,अखेर हा शोध संपला आहे.   
अक्षय शिंदे याचा अंत्यविधी बदलापूरमध्ये करण्यास स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी विरोध दर्शवला.
 त्यानंतर,अक्षयच्या कुटुंबीयांनी अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीतील जागेची सुद्धा पाहणी केली होती.
मात्र,अंबरनाथमध्ये सुद्धा मनसे आणि शिवसेनेने त्याचा अंत्यविधी करण्यास विरोध दर्शवला.
याबाबत स्मशानभूमी बाहेर शिवसेनेने बॅनर सुद्धा लावला आहे.
तर दुसरीकडे बदलापूर नगरपालिकेने पोलिसांना काही जागा सुचवल्या असून अजूनही जागेची निश्चिती मात्र झालेली नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे त्याचा अंत्यविधी करण्यासाठी आता फक्त आजचा एकच दिवस उरला असून त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारला अक्षय शिंदेचा अंत्यविधी करावा लागणार आहे.
त्यातच,आता उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षयच्या अंत्यविधीसाठी खड्डा खोदण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस तुम्हाला मृतदेह दफन करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देतील,कोर्टाचे आदेश---
यावर न्याय‍धीशांनी महत्त्वाचे आदेश दिले. सरकार तुम्हाला योग्य ते सहकार्य करेल. तसेच पोलीस तुम्हाला मृतदेह दफन करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देतील. यावर पुढील सुनावणी सोमवारी होईल, असे न्याय‍धीशांनी म्हटले. यानंतर आरोपीच्या वकिलांनी मी बाहेर जाऊन माध्यमांना काय उत्तर देऊ, त्यांनाही याप्रकरणातील सत्य समजलं पाहिजे,असा प्रश्न न्याय‍धीशांना विचारला.
 त्यावर न्यायाधीशांनी सरकारला सोमवारपर्यंत मृतदेह दफन करण्यासंदर्भात कारवाई करा.
उद्या जरी दफन करण्यात आले तर सोमवारी आम्हाला याबद्दलची माहिती द्या,असे आदेश दिले.
अंत्यसंस्काराला केवळ जवळच्या नातेवाईकांनीच उपस्थित राहावे-
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारने हाताळावा, असे न्यायालयाने म्हटले.
अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला केवळ जवळच्या नातेवाईकांनाच उपस्थित राहण्यास सांगण्यात यावे,अशी विनंती वेणेगावकर यांनी केली.
वडिलांच्या वकिलांना कोर्टाने तसे निर्देश दिले.
तसेच त्याच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन आणि निवडक कुटुंबीयांच्या उपस्थितीत शांततेत दफनविधी होईल याची खबरदारी घ्या, अशी सूचना देखील सरकारला केली.
उल्हासनगर मध्ये मृतदेह दफन करण्यास विरोध-
स्थानिक लोक,तृतीयपंथी अनेक महिला यांनी दफनविधी करण्यात विरोध केला आहे.
सकाळी पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने खड्डा केला होता.
लोकांनी हाताने व फावड्याच्या साह्याने तो खड्डा बुजवला.
त्या ठिकाणी बॉडी पुरू नये यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते.
पोलिसांच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे
उल्हासनगर मध्ये तो बुजवलेला खड्डा पुन्हा पोलिसांनी खोदण्यास करण्यास सुरुवात केली.
 यामध्ये अडथळांना स्थानिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यासोबतच त्या ठिकाणचा गेट सुद्धा बंद करण्यात आला आहे..

Saturday, 28 September 2024

अखेर सोलापूर शहरातील अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया यशस्वी; ३६ शिक्षकांना मिळाली नवीन शाळा

सोलापूर शहरातील खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी नेहरू वसतिगृह येथे दुपारी 12.00 वाजता सुरू झाली.
ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.
या प्रक्रियेसाठी काही संघटनांनी विरोध दर्शविला होता,पण प्राथमिक शिक्षण अधिकारी मा.श्री.कादर शेख साहेबांनी शंकेचे निरसन करत 2022-23 ची समायोजन प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
या प्रक्रियेवर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांनी समायोजन बाबत कार्यालयात खालील प्रमाणे पत्र दिले होते.
 त्यामध्ये या प्रकारावर मुद्दे नमूद करण्यात आली होते .

विषय :- सन २०२२-२३ चे खाजगी प्राथमिक अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत..
संदर्भ :- ०३.०७.२०२४ रोजी संघटनेने आपल्या कार्यालयास दिलेले पत्र
१) सन. २०२१-२२ च्या समायोजनातील अतिरिक्त शिक्षकांना हजर करुन न घेतलेल्या शाळेतील रिक्त पदे प्रथम कमी करावीत.

२) सर्व शाळांचे १००% सेवकसंच दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर समायोजन प्रक्रिया सुरु करावी.

३) सन २०२२-२३ च्या सेवक संचानुसार खाजगी अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणे.

४) सन २०२२-२३ च्या सेवक संचानुसार शाळांमधील रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करणे.

५) शैक्षणिक वर्षानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना समायोजनात प्रथम प्राधान्य दयावे.

६) समायोजन करताना जात संवर्गनिहाय समायोजन करावे.

७) समायोजनातून उरलेल्या शिक्षकांना ४ ऑक्टोंबर २०१७ च्या शासन आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कायम स्वरुपी समायोजित करावे.

वरील मुद्दे विचारात घेऊन समायोजन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी ही नम्र विनंती.
आपला विश्वासु,
(भारत गुणापुरे)
अध्यक्ष
या प्रक्रिया दरम्यान काही शिक्षकांनी प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडल्याचे सांगितले.
तर प्रक्रिया दरम्यान शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मा.श्री.कादर शेख साहेब यांनी सांगितले की 2022-23 खाजगी प्राथमिक शाळेमधील शिक्षक अतिरिक्त झाले होते.
त्यामधील बिगर अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षक यांचे आज दि.28 रोजी नेहरू वसतिगृह येथे समायोजन प्रक्रिया आयोजित केली.
यामध्ये रिक्त पदांची खात्री करून संवर्ग व पद याविषयी सर्वांना सूचना करून शासन निर्णय बाबी सांगून सर्वांचे आक्षेप लक्षात घेऊनच त्यांचे निरसन करण्यात आले.
 समायोजन प्रक्रिया यशस्वीरित्या राबवण्यात आली. यावेळी रिक्त पदे किती आहेत कोणती आहेत.
हे सांगण्यात आले,प्रत्येक शिक्षकाला शाळा निवडताना ठराविक वेळही देण्यात आला होता.
यामुळे शिक्षकांना योग्य ती शाळा निवडण्यात अडचण आली नाही या प्रक्रिया दरम्यान एकूण 36 शिक्षकांना समायोजन प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते व ती प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली.प्रशासनाच्या वतीने मुख्याध्यापक,संस्थाचालक यांना समायोजित शिक्षकांना लवकरात लवकर हजर करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
 जर रुजू करण्यास विलंब केला तर याची सर्व जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
एखाद्या शिक्षकाला हजर करून घेण्यास उशीर झाला तर मधल्या काळाचे वेतन हे प्रशासन न देता ते वेतन मुख्याध्यापक यांच्याकडून वसूल केले जाईल असे सांगण्यात आले.

ही समायोजन प्रक्रिया यशस्वीरित्या पार तर पडली पण त्या शिक्षकांना मुख्याध्यापक संस्थाचालक लवकरात लवकर रुजू करून घेतील का?
हे आता पहावे लागणार आहे.
...................................................
2022-23 समायोजन प्रक्रिया नियमानुसार व पारदर्शकपणे शासन निर्णया नुसार योग्य प्रकारे पार पडली.
सुनील चव्हाण
प्रदेश महासचिव
डॉ. देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद