Wednesday, 30 August 2023

नाविन्यपूर्ण उपक्रम-उपस्थिती ध्वज

रोजची दैनंदिन उपस्थिती वाढवण्यासाठी आपल्या प्राथमिक विद्यामंदिर बार्शी येथे एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला असून त्याची आज सुरुवात करण्यात आली.

परिपाठ व शाळेची उपस्थिती वाढावी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने याची आज या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमाची मुलांना अगोदरच सूचना दिलेली होती.
या उपक्रमाची शिक्षकांसह विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता होती. सर्व विद्यार्थी उपस्थित राहावे,यासाठी प्रत्येक वर्गाचे वर्गशिक्षक धडपड करत असल्याची दिसून येत होते.

त्याचबरोबर आपल्या वर्गातील मित्र-मैत्रीण लवकर यावे यासाठी सर्व विद्यार्थी प्रयत्नशील असलेल्या दिसून आले.
 या उपक्रमाने रोजच्या उपस्थिती पेक्षा सरासरी जास्त असल्याचे दिसून येत होते.
🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭
🟣उपक्रम राबवायचा कसा-----
१)परिपाठ घेताना हा उपक्रम घेण्यात यावे,त्यामुळे शाळेचा वेळ वाचेल.

२)परिपाठात शाळेच्या वेळेत हजर असलेले विद्यार्थी उपस्थित ग्राह्य धरण्यात यावे.

३)परिपाठात सुरू झाल्यावर आलेल्या विद्यार्थ्यांना ग्राह्य धरू नये,जेणेकरून सर्व विद्यार्थी वेळेवर शाळेत उपस्थित राहतील.

४)प्रत्येक वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गाचा पट व उपस्थिती यांची टक्केवारी काढून ते परिपाठ प्रमुखांना द्यावे.

५)ज्या वर्गाची उपस्थिती जास्त त्यांना पांढऱ्या रंगाचा ध्वज देण्यात यावा.

६)उपस्थिती ध्वज वर्गशिक्षक व वर्गाचा विद्यार्थी प्रतिनिधी त्यांना समोर बोलावून त्यांचे कौतुक करण्यात यावे.

७)ध्वज शाळा सुटेपर्यंत त्या वर्गासमोर ठेवण्यात यावे.

८)ध्वजाचा रंग निवडताना सामाजिक तेढ निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी.

९)शाळा सुटल्यानंतर वर्गशिक्षक यांनी ते व्यवस्थित काढून मुख्याध्यापक यांच्याकडे सोपवण्यात यावे.

१०)निश्चितच या उपक्रमातून शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढणार असून प्रत्येक विद्यार्थी हा शाळेच्या वेळेत हजर राहतील व विद्यार्थी उशिरा येतात त्यावर चाप नक्की बसेल.
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
प्रत्येक विद्यार्थी हे वेळेवर शाळेत उपस्थित होते सर्व विद्यार्थी वेळेवर हजर राहावे यासाठी
 सर्वजण प्रयत्नशील असल्याचे दिसून आले या उपक्रमामुळे संपूर्ण शाळेची उपस्थिती निश्चितच वाढल्याची दिसते 
यासारखे मुलांच्या विकासासाठी आपण नेहमी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असतो.
 हे उपक्रम सर्व शाळेनी आपल्या शाळेत राबवावा....
मुख्याध्यापिका 
सौ योगिता बेळे 
प्राथमिक विद्यामंदिर बार्शी

पालकांची वाढली चिंता; मोबाइल घेतल्यावर उचलतात टोकाचे पाऊल पोरांना रागवायचं नाही का?

किशोरवयीन वय हे इतकं
अल्लड असतं की, चांगलं नि वाईट काय? हे समजण्याची त्यांची बौद्धिक कुवतच नसते.
 अशा वयात मुलांच्या हातात मोबाइल पडल्याने माहितीचे महाजालच जणू मुला-मुलींसाठी खुले झाले आहे; मात्र त्याचा अतिरेकी वापर अल्पवयीन मुला-मुलींना मोबाइलचे जडलेले व्यसन ही आता पालकांसाठी डोकेदुखी बनली आहे.

मोबाइलमुळे मुलांचे स्वतःचे एक विश्व तयार झाले आहे, त्यातून बाहेर काढण्यासाठी पालकांनी कठोर पावले उचलण्याचा प्रयत्न केला, तर घरातून निघून जाण्याची किंवा आत्महत्या करण्याची धमकी देणे 
किंवा आदळआपट करून राग व्यक्त आईने मुलाला कोणतेही काम करणे असे प्रकार घडत असल्याने मुला-मुलींचे मोबाइल व्यसन सोडवायचे कसे? अशी चिंता पालकांना भेडसावू लागली आहे.
मुले-मुली वयात आल्यानंतर त्यांच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक बरेच बदल घडत असतात. नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची त्यांच्यात उत्सुकता निर्माण झालेली असते; पण त्यांच्यातील बदलांचे निरीक्षण करीत पालक नव्हे, तर एका

मित्रत्वाच्या भूमिकेतून त्यांच्याशी संवाद साधण्याची प्रक्रिया पालकांच्या स्तरावर सुरू होते; मात्र मोबाइलमुळे पालक आणि मुलांमध्ये विसंवादाची एक दरी निर्माण झाल्यासारखे झाले आहे.

आईने मुलांना कोणतेही काम
सांगितले, तरी मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेला मुलगा काम करण्यास टाळाटाळ करतो. त्याची अचानक चिडचिड सुरू होते. आई पुढे काही बोलली की, तो घरातून राग डोक्यात घालून बाहेर पडतो, असे चित्र बहुतांश घरांमध्ये पाहायला मिळत आहे. पाल्यांचा वाढता चिडचिडेपणा, एकटेपणा, विसंवाद या दुष्परिणांमुळे मुला-मुलींशी वागायच कसं? या कात्रीत पालक सापडले आहेत.
🟣प्रसंग १ : दोन दिवसांपूर्वी
मुलीच्या हातातून मोबाइल काढून घेतला म्हणून १३ वर्षांची मुलगी घर सोडून निघून गेली. पालकांनी सगळीकडे शोधले शेवटी ती रेल्वेस्टेशनच्या बसस्थानकावर बसलेली सापडली.

🟣प्रसंग २: मुलगा अभ्यास करण्याचे सोडून सतत व्हिडीओ गेमच्या आहारी गेल्याचे दिसल्यानंतर पालकांनी त्याच्या मोबाइलला लॉक लावले. त्याचा राग आल्याने मुलाने मोबाइल सहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिला.
लहान मुलांचे वयोगटाप्रमाणे समस्या वेगळ्या आहेत. चौथीपर्यंतच्या मुलांना लहान लहान म्हणत असतो आणि तेच पाचवी ते दहावीच्या
मुलांना एकदम आता तू मोठा झालास असे म्हटले जाते. ते मुलांना स्वी येत नाही. 
सध्या कुटुंबांमध्ये सिंगल चाइल्डचे प्रमाण अधिक आहे. त्यांना हव्या त्या गोष्टी आणून दिल्या जातात. त्यामुळे नकार पचवणे त्यांना अवघड जाते; पण मैदानी खेळच बंद झाले. 
घरात मुलांनी उपद्व्याप करू नये, त्यासाठी मुलांना आपणहून हातात मोबाइल दिले जातात किंवा टीव्हीसमोर बसविले जाते.
 पालकांकडूनच या सवयी मुलांना लावल्या जातात, मग ते व्यसन बनल्यानंतर पालकांना चुकांची जाणीव होते.
- अरुंधती खाडिलकर, मानसोपचारतज्ज्ञ
लोकमत

हरवलेल्या बाळाला शोधण्यासाठी अंत्ययात्राही तासभर थांबली... मशिदीच्या भोंग्यावरून देण्यात आली सूचना

हरवलेल्या बाळाला शोधण्यासाठी अंत्ययात्राही तासभर थांबली... मशिदीच्या भोंग्यावरून देण्यात आली सूचना

कासोदा एका वृद्धेची अंत्ययात्रा सोमवारी संध्याकाळी ४ वाजेदरम्यान निघणार होती.
 या गर्दीत तीन-चार वर्षांचा बालक अचानक हरवला,शोधाशोध सुरू झाली... 
नातेवाईक या बाळाचा शोध गावभर फिरू लागले.
मशिदीच्या भोंग्यावरून देखील माहिती देण्यात आली. 
तासाभराच्या धावपळीनंतर हा बाळ सापडला आणि जिवाचा आकांत करणारी आई व उपस्थितांनी निःश्वास सोडला.

निवृत्त पोस्टमन वसंतराव सोनार यांच्या पत्नी इंदूबाई सोनार (६७) यांचे २८ ऑगस्ट रोजी निधन झाले. नातेवाईक सर्वांना निरोप गेले, अंत्ययात्रेसाठी वेळ संध्याकाळी ४
वाजेची ठरविण्यात आली. 
सर्वच नातेवाईक वेळेआधी जमले.
वसंतरावांची पुतणी दीपाली ही जळगावहून चार वर्षांच्या बाळासोबत आली होती. 
जमलेल्या गर्दीत तिचे बाळ अचानक तेथून निघून गेले. 
पाच सात - मिनिटांनी बाळ दिसत नव्हते. 
आई कावरीबावरी झाली. 
या बाळाची 
या दुःखात जमलेल्या सर्वांपर्यंत पोहोचली आणि सर्वत्र शोधाशोध सुरू झाली.

रस्ता मिळेल तिकडे गल्लीबोळांत दुचाकी व पायी सर्वच लोक या बाळाचा शोध घेऊ लागले. 
आईचा आकांत हृदय पिळवटून टाकत होता. अर्ध्या पाऊण तासानंतर हे बाळ बाजारपट्ट्यानजीक मंदिराजवळ आढळून आले. 
एका महिलेने त्याला सुखरूप सांभाळले होते. 
बाळाला व्यवस्थित बोलता येत नसल्याने ते पत्ता सांगू शकत नव्हते की आई-वडिलांचे नाव सांगू शकत नव्हते.
 त्यामुळे त्याला शोधण्यात खूप अडचणी आल्या.
 एक तर म्हातारी मेल्याचे दुःख व त्यात बाळ हरविल्याची घटना यामुळे ही अंत्ययात्रा चर्चेचा विषय ठरली.
माणुसकीचे दर्शन-ज्या वेळेस मूल मिळत नव्हते.
 त्यावेळेस मुस्लिम बांधवांनी नमाज पठण साठी वापरल्या जाणाऱ्या भोंग्याचा त्यावेळेस वापर केल्याने गावातील सर्व लोकांना लहान बाळची हरवल्याची सूचना देण्यात आली..

लोकमत
कसोदा 
प्रमोद पाटील