Saturday, 29 April 2023

42 दिवसांची विशेष रजा मिळणार केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय--------

42 दिवसांची विशेष रजा मिळणार केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय--------
केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला अवयवदान केल्यास त्यास
 42 दिवसांची विशेष रजा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
अवयव दान केल्यानंतर दात्याची प्रकृती पूर्वपदावर येण्यास काही काळ जाऊ द्यावा लागतो या पार्श्वभूमीवर हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी 30 विशेष रजा आहेत.
देशात मानवी अवयव आणि उती पेशी प्रत्यारोपण कायदा 1994 नुसार अवयवदार शस्त्रक्रिया करण्यात येतात.
 त्यात आपल्या जवळच्या व्यक्तीला किडनी आणि यकृत हे दोनच अवयव देता येतात.
अवयव दात्यास शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागते क्षेत्र क्रिया केल्यानंतर दात्याची प्रकृती पूर्वपदावर येण्यास काही काळ जाऊ द्यावा लागतो.
हे गृहीत धरून 42 दिवसांची विशेष रजा देण्याचे ठरविण्यात आले आहे.
विशेष रजा इतर कोणत्याही रजेसोबत जोडून घेता येणार नाही अपवादात्मक परिस्थिती जर शस्त्रक्रियेमध्ये काही गुंतागुंत निर्माण झाल्यास
 परवानाधारक डॉक्टरांच्या संमतीने अधिक रजा घेता येईल.

आरटीई प्रवेशात अशी गंडवागंडवी;शाळांनीच केले स्टिंग ऑपरेशन-----

आरटीई प्रवेशात अशी गंडवागंडवी;शाळांनीच केले स्टिंग ऑपरेशन

आलिशान घर,महागडी गाडी,स्मार्ट फोन,अंगा खांद्यावर खेळणारी सुवर्णाभूषणे असणाऱ्या आर्थिक सक्षम गटात येणाऱ्या पालकांनी चक्क 'आरटीई' अंतर्गत पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी अर्ज करून प्रवेश सुद्धा पोर्टलद्वारे निश्चित झाला आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
'आरटीई' अंतर्गत प्रवेशासाठी सुरू असलेल्या या गंडवागंडवीचा पर्दाफाश चक्क खासगी शाळांनी पुराव्यानिशी केला आहे. 
शाळांकडे प्राप्त अर्जातील केवळ वीस टक्केच अर्ज खरे आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे शाळांनी केलेल्या स्टिंगमध्ये समोर आले आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे कुठल्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांनाही दर्जेदार शाळांमध्ये दुरुपयोग करून आर्थिक सक्षम गट
याचा फायदा घेत असल्याचा आक्षेप खाजगी शाळांनी शासनाच्या स्तरावर यापूर्वी केला होता.
मात्र
बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशी भूमिका शासनाच्या स्तरावर घेतली जात असल्याने शाळांचे मोठी कुचंबना होते आर टी ई ची प्रस्ताव शासनाने दिला नसल्याचा विचित्र सहा शाळांनी नवीन प्रवेश न देण्याची भूमिका घेतली शासकीय स्तरावर चिरीमिरी देऊन आवश्यक होते
 त्या रकमेच्या उत्पन्नाचा दाखला मिळवून शासनाची फसवणूक करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे धाडस शासनाने दाखविणे आवश्यक आहे.

🟣 खाजगी शाळांनी असे केल्यास स्टिंग------
शासनाच्या पोर्टलवर शाळांकडे प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पालकांनी दिलेल्या पत्त्यावर शाळेतील कर्मचारी पोहोचले त्यांनी पालकांची जीवनशैली आणि राहणीमान यांची छायाचित्रासह माहिती घेतली यातून पुढे आलेली माहिती धक्कादायक आणि शासकीय यंत्रणांना हादरवून सोडणारी अशीच आहे.
🟣तर धनदांडग्याचे बनावट मुखवटे गळतील-----
💥शासनाच्या योजनेचा लाभ गरजवंतांना मिळत नसल्याचे खासगी शाळांनी यापूर्वीही शासनाला सांगितले होते. यावेळी या बाबी पुराव्यासह खासगी शाळांनी स्वतःकडे ठेवल्या आहेत.
💥शंभरात अवघे २०-२५ पात्र उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरुवातीलाच गांधारीचे रूप धारण केलेल्या शासनाने आरटीई आदेशाची अंमलबजावणी करण्यापूर्वी सत्यता तपासून मगच प्रवेश देण्याची भूमिका घेतली असती तर धनदांडग्यांच्या चेहऱ्यावरचे मुखवटे मागेच गळून पडून खच्या गरजूला याचा लाभ मिळाला असता.

🟣वकील, शिक्षकांकडून आरटीईचा गैरफायदा------
गरीब, दुर्बल, वंचित घटकांसाठीच असलेल्या आरटीई शिक्षणाचा मोफत अधिकाराचा गैरफायदा घेणाऱ्यांमध्ये वकील, शिक्षक, पोलिस, सरकारी कर्मचारी यांच्यासह व्यावसायिकांचाही समावेश आहे. दुमजली घर आणि दारात लाखो रुपयांची गाडी असलेल्यांनी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
🟣चक्क शाळेच्या कंपाऊंडमध्येच निवास!-----
1)💥खासगी शाळांमध्ये अर्ज केलेल्या एका पालकाने शाळेपासून निवासस्थानाचा पत्ता ०.०१ मीटर असा नमूद केला आहे.
2)💥त्यांनी दर्शविलेल्या गुगल मॅपनुसार पाहणी केली तर चक्क शाळेच्या कंपाऊंडमध्येच हे निवासस्थान असल्याचे दर्शवित आहे.

आरटीईची योजना गरजूंसाठी असताना प्रत्यक्षात त्याचा गैरफायदा आर्थिक सक्षम गटाकडून घेतला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
ही योजना ज्यांच्यासाठी आहे त्यांनाच त्याचा लाभ मिळावा. दुर्बल आणि गरीब वंचित यांचा हक्क फसवून घेणे म्हणजे हा गुन्हाच आहे.
चुकीच्या गोष्टींना आमचा विरोध आहे.
- राजेंद्र चोरगे, राज्य उपाध्यक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क

👆विद्यार्थ्यांना आता प्रगती पुस्तक (गुणपत्रक) ०१ मे ऐवजी ०६ मे ला मिळणार....

🟣👆विद्यार्थ्यांना आता प्रगती पुस्तक (गुणपत्रक) ०१ मे ऐवजी ०६ मे ला मिळणार....

राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व सुसंगत आणण्यासाठी सण 2023 ची उन्हाळा सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत संदर्भीय क्रमांक एक वरील शासन निर्णयानुसार तपशीलवार सूचना प्राथमिक शिक्षण संचालनाच्या संदर्भीय क्रमांक दोन वरील पत्रांवर निर्गमित करण्यात आले आहेत.
उक्त सूचनांमध्ये सुट्टीचा कालावधी शाळांची निकाल जाहीर करणे.
सन 2023-24 आगामी शैक्षणिक वर्ष सुरू करणे. इत्यादी बाबतच्या सूचना नियमित करण्याबाबत आल्या आहेत.
दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृति शताब्दी वर्षाची सांगता दिनांक 6 मे 2023 रोजी आहे.
महाराष्ट्र दिन व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
🟣1) दिनांक 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिन सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात यावा.

🟣2) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक सहा मे 2023 रोजी शाळांचा शैक्षणिक वर्ष सन 2022-23 चा निकाल जाहीर करावा आणि विद्यार्थी पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात यावे.
तसेच निकाला सोबत उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात यावा.

🟣3) संदर्भीय क्रमांक एक वरील शासन निर्णय आणि संचालनायाच्या संदर्भात दोन वरील पत्रामध्ये दिलेल्या सूचनानुसार शाळांच्या उन्हाळा सुट्टी व शैक्षणिक वर्ष सण 2023-24 सुरू करण्याच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

जा.क्र.प्राशिस.२०२३/शाळासुट्टी/५१६/३५१७
प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य

Friday, 28 April 2023

आजच्या महत्त्वाच्या बातम्या शनिवार दिनांक २९ एप्रिल २०२३

सापडलेली उल्का जर इस्रो अथवा नासाला दिल्यास त्याबदल्यात काही पैसे मिळतात का?

सापडलेली उल्का जर इस्रो अथवा नासाला दिल्यास त्याबदल्यात काही पैसे मिळतात का?

नेहमीच आकाशातून मौल्यवान दगड किंवा उल्कापिंड पृथ्वीवर पडत असतात.
 हे दगड वैज्ञानिक रिसर्चसाठी विकत घेतले जातात. काही लोक हे दगड घरात सजवून ठेवतात.
 तर, काही लोकांना हे उल्का असल्याचं माहित देखील नसतं, सामान्य दगड समजून ते तिथे लक्ष देत नाहीत आणि सोडून देतात. 
उल्कापिंड हे खूप बहुमूल्य असतात आणि त्यांची किंमत ही त्यात असणाऱ्या घटकांनुसार ठरते. 
जसे कि लोह, प्रथिने, इ. तरीही सांगायचे झाल्यास त्यांची किंमत अंदाजे 2200 डॉलर प्रति ग्रॅम असते.
 म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास 1 लाख रुपये आहे. ही सोन्याच्या किंमतीपेक्षा 4400 टक्के जास्त आहे.

आग ही ऑक्सिजन शिवाय जळू शकत नाही आणि अंतराळात ऑक्सिजन नाही.मग सूर्य कसा जळत आहे?

आग ही ऑक्सिजन शिवाय जळू शकत नाही आणि अंतराळात ऑक्सिजन नाही.मग सूर्य कसा जळत आहे?

पृथ्वीवर आग ही ऑक्सिजन शिवाय जळू शकत नाही कारण जळणे ही रासायनिक प्रक्रिया आहे ज्यासाठी ऑक्सिजन गरजेचे आहे… 
परंतु सूर्य हा एक मोठा हायड्रोजन बॉम्ब सारखा आहे ज्यात सतत nuclear fusion आणि nuclear fision ची प्रक्रिया होत असते.
 जी रासायनिक प्रक्रिया नाहीतर ती नैसर्गिक प्रक्रिया 2 आहे ज्याला फक्त उष्णता लागते….

सूर्यावर जी प्रक्रिया घडते ती chain reaction आहे . दोन हैड्रोजन अणु एकत्र येऊन एक हेलियम रेणू बनतो जी nuclear fusion ची प्रोसेस आहे 
यात nucleus आणि प्रोटॉन मधील repulsion च्याविरोधात प्रचंड energy लागते जी सूर्यजवळील हवामानात असते.
परंतु यातून जो हेलियम चा रेणू तयार होतो तो खूप unstable असतो ज्याला सुर्याभोवतीचा हवामान कारणीभूत आहे…
5500℃ च्या तापमानात हेलियम nuclear fission ची प्रोसेस होते ज्यातून 2 हेलियम चे अणू आणि प्रचंड energy/heat बाहेर पडते त्यापैकी 30% energy nuclear fusion साठी वापरली जाते
आणि शिल्लक 70% energy ही internal energy म्हणजेच तापमान वाढण्यासाठी कामात येते (according to 1st law of thermodynamics).

ही chain reaction सलग चालू असते आणि यामुळेच सूर्याजवळील तापमान सतत वाढत असतो..

तर सूर्य हा जळत नसून तिथे नैसर्गिक क्रिया आहे ज्यात ऑक्सिजन नाहीतर उष्णता/energy लागते…

यातून एक अनुत्तरित प्रश्न निर्माण होतो की सूर्याचा तापमान 5500℃ आहे आणि सूर्याच्या हवामानाचा तापमान 16लाख ℃ कसकाय??