Sunday, 26 February 2023

27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस


मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जातं. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
 
कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले.
कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा, कांदबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इ. यांचे कुशल लेखन केले.
विशाखा हा कवितासंग्रह आणि नटसम्राट हे नाटक त्यांच्या दोन गाजलेल्या साहित्यकृती आहेत. 
 
कुसुमाग्रजांच्या कारकीर्दीत पाच दशके विस्तारली आणि या काळात त्यांनी कविता, लघुकथा, निबंध, नाटकं आणि कादंबर्‍या या रुपात सुंदर साहित्य तयार केलं.
1942 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारी कवितासंग्रह, विशाखा ही त्यांच्या सर्वात प्रसिद्ध लेखणीपैकी एक आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे स्थापना केली. 
 
महान राष्ट्र अशी ओळख असलेले राज्य म्हणजेच महाराष्ट्र या राज्याची मातृभाषा मराठी आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो.
या दिवशी विविध शाळांमध्ये भाषण, निबंध, नाटक, वकृत्व, कविता स्पर्धा आयोजित केल्या जातात.
तसेच सरकारी कार्यालयात अनेक उपक्रमाद्वारे हा गौरव दिन साजरा केला जातो. 
मराठी ही सर्वांगसुंदर भाषा असून भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी एक भाषा आहे.
मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 15 वी भाषा आहे तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे.
महाराष्ट्र तसेच गोवा या 2 राज्यांची मराठी ही अधिकृत राज भाषा आहे. मराठी भाषेची साहित्यसंपदा विपुल असून या भाषेला थोर परंपरा लाभली आहे.
मराठी भाषेचा उगम नवव्या शतकापासून झालेला समजतो. या भाषेची निर्मिती संस्कृत पासून झाली आहे.
पैठण येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर केला.
नंतर देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी झाली. इसवीसन बाराशे अष्टोत्तर मध्ये म्हाईमभट यांनी लिळा चरित्र लिहिले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली.
ते म्हणतात माझी मराठीची बोलू कौतुके,परी अमृताहे पैजा जिंके.
अर्थात आपली मायबोली अमृतालाही पैंजेत जिंकेल. संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली. मराठी भाषा अनेक संताच्या कीर्तनांनी, ओव्यांनी तशीच भजनांनी सजली आहे.
या भाषेला अनेक मराठी साहित्यिकांच्या लेखनींची समृध्दी आणि संपन्नता लाभलेली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे संरक्षण केले. महाराजांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला.
मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असली तरी गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड तसेच दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशातील काही भागात सुद्धा मराठी भाषा बोलली जाते.
भारताव्यतिरिक्त परदेशात देखील ही भाषा बोलली जाते कारण आपल्या देशातील अनेक लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी-व्यवसायासाठी इतर देशात असल्यामुळे भाषा बोलली जाते.
 
आत्ताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत  इतर भाषा येणे सुद्धा गरजेचे असलं तरी आपल्या मराठी भाषेचे महत्तव टिकवून ठेवणे देखील तेवढेच आवश्यक आहे. मराठी भाषेतील साहित्य समृद्ध असल्याने येणार्‍या पिढील मराठी साहित्याची ओळख करुन दिली पाहिजे. संतांनी, लेखकांनी, इतिहासकरांनी आपल्या भाषेत दिलेलं ज्ञान मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या मातीबद्दल अभिमान वाढेल.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।

कुसुमाग्रज यांचा जन्मदिन,२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

Saturday, 25 February 2023

बारावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट सहा गुण मिळणार.....i


बारावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट सहा गुण मिळणार
इयत्ता बारावीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्न ऐवजी पर्यवेक्षकांना दिलेल्या पेपर तपासण्याच्या सूचना छापण्यात आल्या होत्या.
अखेर बोर्डाला चूक लक्षात आली असून सर्वच विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांचे सरसकट सहा गुण देण्याची भूमिका पुणे बोर्डाने घेतली आहे.
 बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपर मधील तीन प्रश्न चुकीचे होते
 त्यामुळे पहिलाच पेपर देताना विद्यार्थी संभ्रमात सापडले होते.

 त्या प्रश्नांची नेमके काय उत्तर लिहावे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा होता
 बहुतेक विद्यार्थ्यांनी ही बाब पर्यवेक्षकाचे निदर्शनास आणून दिले.
काहींनी आहे तशाच सूचना उत्तर पत्रिकात लिहिल्याचेही सांगण्यात आले
 इंग्रजी पेपर मधील पान नंबर 10 मध्ये हा प्रकार पाहायला मिळाला 

प्रश्न क्रमांक A-3 इंग्रजी कवितेवर आधारित हवा होता 
पण त्या जागी तपासणाऱ्याला सूचना छापून आली होती.
A-4 ला कवितेवर आधारित प्रश्न अपेक्षित असताना त्या ऐवजी उत्तर छापण्यात आले होते 
तर A-5 हा प्रश्न देखील दोन गुणांचा होता 
आणि येथे देखील प्रश्न ऐवजी तपासणाऱ्याला दिलेल्या सूचना छापल्या होत्या
 या तिन्ही प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनी नेमके करायचं काय हा प्रश्न दिलेला नाही

 तसेच ते तिन्ही प्रश्न प्रत्येकी दोन गुणांसाठी विचारण्यात आले होते 
त्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवलाच नाही 
दरम्यान प्रचलित पद्धतीप्रमाणे इंग्रजीचे विषय तज्ञ व सर्व शिक्षक विभागीय मंडळाचे प्रमुख नियमक यांच्या समवेत संयुक्त सभा झाल्यावर सरसकट गुण देण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.

झेडपीच्या शाळा 05 मार्चपासून सकाळच्या सत्रात;नवे शैक्षणिक वर्ष 15 जून पासून

झेडपीच्या शाळा पाच मार्चपासून सकाळच्या सत्रात 
नवे शैक्षणिक वर्ष 15 जून पासून मुख्य कार्यकारी अधिकारी उद्या घेणार निर्णय-


जिल्हा परिषदेच्या शाळा 5 मार्चपासून सकाळच्या सत्रात भरणार आहेत 
उन्हाचा तडाखा आता दिवसेंदिवस वाढू लागला 
दरवर्षे प्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर 
जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा सकाळी ७.३० ते ११.३० वाजेपर्यंत भरणार आहेत
 दूर अंतरावरून येणारे विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये
 या हेतूने हा निर्णय घेतला जातो शनिवारी तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसच्या वर होता 
सोमवारी तापमान अजून वाढेल उन्हाची चटके चिमुकल्यांना बसणार नाहीत 
याची खबरदारी शालेय शिक्षण विभागाकडून दरवर्षी घेतली जाते. 
मात्र वर्षभरातील सार्वजनिक तथा शासकीय सुट्ट्यांचा विचार करून 
कधीपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवता येईल 
याचा कृती आराखडा तयार केला जातो. 
उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका असतो आणि उन्हामुळे अध्यापनाला देखील अडचणी निर्माण होतात 
त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला 01 मार्च ते 30 एप्रिल या दोन महिन्यात शाळांची वेळ सकाळीच असते 
यंदा एक मार्च ऐवजी 5 मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरू होणार आहेत 
पण प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यासंबंधीची माहिती देईल त्यानंतर तेच सोमवारी त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेणार आहेत.

नवे शैक्षणिक वर्ष 15 जून पासून
जिल्ह्यातील जिल्हाअंतर्गत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया 27 फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार आहे 
ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून यांना प्रथमच सर्व शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने केल्या जात आहेत परंतु जून जुलैमध्ये होणाऱ्या बदल्या फेब्रुवारी संपला तरी देखील पूर्ण झालेल्या नाहीत
 आता पुढील आठवड्यात त्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होईल 
पण त्यांना नवीन शाळेवर कधीपासून रुजू व्हावे लागेल
 हे अद्याप गुलदस्तातच आहे दरम्यान आगामी शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होईल
 असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे

कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या 
2997 शाळा सकाळच्या सत्रात भरतील
 01 मार्च की 05 मार्चपासून शाळांच्या वेळा भरतील
 यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी पुढील आठवड्यात घेतील 
त्यानंतर सर्व शाळांमध्ये त्या निर्णयानुसार अंमलबजावणी केली जाईल.

संजय जावीर
 प्राथमिक शिक्षणाधिकारी
 जि.प. सोलापूर

आजच्या महत्त्वाच्या बातम्या रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२३

14 मार्च 2023 पासून करण्यात येणाऱ्या ‘बेमुदत संप’ विषयक भूमिका स्पष्ट करणेबाबत.

 राज्य सरकारी-निमसरकारी,शिक्षक–शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र
 राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र

दि. १४ मार्च 2023 पासून करण्यात येणाऱ्या ‘बेमुदत संप’ विषयक भूमिका स्पष्ट करणेबाबत.

महोदय,
      सविनय विनंती आहे की, राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती तथा  महाराष्ट्र तथा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांच्या नेतृत्वात दि. 14 मार्च 2023 पासून बेमुदत संप केल्या जाणार आहे. त्याला अनुसरून दि. 22 फेब्रुवारी 2023 ला महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समितीतील सर्व संघटनाची सभा मुंबई येथे पार पडली. 
सदर सभेमध्ये  दि. 14 मार्च 2023 पासून करण्यात येणाऱ्या बेमुदत संपाबत आपण घेतलेल्या भूमिकेविषयी संदिग्धता व्यक्त करण्यात आली आहे. 
करिता खालिल मुद्याला अनुसरून बेमुदत संप विषयक आपली भूमिका स्पष्ट करावी. 

1) दि. 14 मार्च 2023 चा बेमुदत संप हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र या संघटनेला विशेब बाब म्हणून शासन मान्यता देण्यासाठीच्या प्रमुख मागणीसाठी केली जात आहे काय ?
तसे असेल तर आपल्या  संघटनेच्या मान्यतेसाठी  आपण अन्य संघटनेचा संपासाठी वापर करत आहात असे समजू नये काय ? मग  बेमुदत संप हा  ‘जुनी पेन्शन योजना’ मागणी साठी करण्यात येत असल्याचे आपण जाहीर सांगत आहात हि बाब जुनी पेन्शनच्या नावाने कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणारी दिसून येत नाही काय?

2) आपण आयोजित केलेल्या दि. 09 फेब्रुवारी 2023  च्या समन्वय समितीच्या बैठकीत फक्त ‘जुनी पेन्शन पूर्ववत लागू करणे’ या एकमेव मागणीसाठी बेमुदत संप करण्यात यावा असे बहुतांश संघटनेने मत व्यक्त केले होते. मात्र तरीही आपण बेमुदत संपाबाबत 18 हून अधिक मागण्या निवेदनात समोर ठेवल्या आहेत.

3) महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने नागपूर येथे हिवाळी अधिवेशन काळात दिड लाख कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत  दि. 27 डिसेंबर 2022 ला काढलेल्या पेन्शन संकल्प आंदोलनाला मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांनी दिलेले आश्वासन व पुढील शिक्षक आणि पदविधर मतदार संघ 

निवडणुकीतील प्रभावामुळे नवीन कर्मचाऱ्याना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यूनिसेवा उपदान  लागू करण्याचा निर्णय शासन स्तरावर अंतिम टप्यात आहे. सदर लाभ लागू करण्यात आल्यास संप मागे घेण्यात येणार आहे का ? तसे असेल तर याला आम्हचा तीव्र विरोध असून जुनी पेन्शन लागू केल्याशिवाय संप मागे घेण्यात येऊ नये याबाबत स्पष्टता हवी.

4) आमच्या वारंवार असे निदर्शांत येत आहे कि, *समन्वय समितीच्या नावाने आपण सर्व संघटनांची सभा आयोजित करता मात्र अंतिम निर्णय हा विशिष्ट संघटने द्वारे परस्पर घेतला जातो. तसेच आंदोलनाबाबत निर्णय घेण्यासाठी विविध संघटना पदाधिकाऱ्यांची सुकाणू समिती आपण स्थापन केली. मात्र कोणताही निर्णय सुकाणू समितीला विचारून घेतला जात नाही.दि. 14 मार्च 2023बेमुदत संपाची तारीख सुद्धा सुद्धा आपण विशिष्ट संघटनेने परस्पर ठरवली आहे. तर मग सर्व संघटनांची समन्वय समितीची बैठक हि नाममात्र असते का? आणि सुकाणू समिती हा फक्त दिखावा आहे का?

महोदय, कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने संघटना महत्वाची नसून त्यांचा जिव्हाळ्याचा विषय महत्वाचा असतो. बेमुदत संपाच्या नावावर जर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र हि स्वतःला शासन मान्यता मिळविण्यासाठी सर्व संघटना वापर करीत असेल तर, त्याला आम्हचा तीव्र विरोध आहे. त्यासोबतच नवीन कर्मचाऱ्याना कर्मचाऱ्याना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यूनिसेवा उपदान  लागू करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला तर संप मागे घेण्याची आपली भुमिका असेल तर हा कर्मचाऱ्यांच्या भावनाशी खेळ ठरणार आहे.
      त्यामुळे जुनी पेन्शन या एकमेव विषयासाठी बेमुदत संप केल्या जात असेल तर त्यात महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समितीतील सर्व संघटनाचा समावेश असेल.
           करिता सदर मुद्द्याला अनुसरून आपली भुमिका तात्काळ स्पष्ट करावी. आणि जुनी पेन्शन या एकमेव मुद्यासाठी बेमुदत संप घेण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समितीतील सर्व घटक संघटना दि. 14 मार्च 2023  पासूनच्या बेमुदत संपात सहभागी होणार नाहीत. असे आपणास सूचित करीत आहोत.                                                       
राज्याध्यक्ष
वितेश खांडेकर
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना