Monday, 25 May 2026

सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे सहशिक्षक राजेंद्र दामोदर ढोले सर यांचे जनगणना करत असताना असताना उन्हाच्या तीव्रतेने झाला मृत्यू......


जनगणना कार्यादरम्यान कर्तव्य बजावत असताना सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे सहशिक्षक मा. राजेंद्र दामोदर ढोले सर यांचे मायाक्का नगर, सांगोला येथे दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. जनगणनेचे कार्य करत असताना उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांना त्रास होऊ लागला. उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू असतानाच त्यांचे अकाली निधन झाले.

ढोले सर हे अत्यंत हुशार, विद्यार्थीप्रिय, नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे तसेच शिक्षकांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण भूमिका घेणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे D.Ed. शिक्षण अक्कलकोट येथे झाले होते. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

तसेच यापूर्वी २० मे २०२६ रोजी

जनगणनेची ड्युटी पूर्ण करून परतत असताना लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे झालेल्या अपघातात जिल्हा परिषद शिक्षक सुंदरम वांगसकर यांचे निधन झाले होते. जनगणना कार्यादरम्यान अशा सलग घडणाऱ्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत.

सर्व प्रगणक, पर्यवेक्षक व शिक्षक बांधवांना नम्र विनंती — सध्या वाढत्या उष्णतेचा विचार करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. काम करताना अडचणी आल्यास सहकारी, पर्यवेक्षक किंवा शिक्षक संघटनांची मदत घ्यावी. आपल्या कुटुंबाचा आणि स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करूनच काम पूर्ण करावे.

मा. राजेंद्र दामोदर ढोले सर व सुंदरम वांगसकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना. 💐🙏

आपल्याला येणाऱ्या अडचणी संदर्भात कृपया आपले सुपरवायझर आपले सहकारी शिक्षक अथवा ग्रुप मधील सदस्य यांची मदत घ्या कामाचा विनाकारण ताण घेऊ नका एकमेकांना सहकार्य करा कारण हे सर्व आपलेच आहेत येणाऱ्या अडचणी संदर्भात आपल्या जवळील शिक्षक संघटनांची संपर्क साधा जर कामासंबंधी अथवा जनगणना संबंधी माहिती हवी असेल तर आपण नक्कीच फोन करा....
आपला सहकारी शिक्षक राहुल दत्तात्रय म्हमाणे 
8482824588

No comments:

Post a Comment