▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
नुकतेच 16 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली.
सर्वत्र महाराष्ट्रात नव्या मुलांचे दिमाखात स्वागत झाले.
शाळेचे रंगरंगोटी,नवीन खेळणी,विदूषकाचे खेळ,व्याख्याने,फुग्यांची सजावट आणखीन बरेच काही.....
शासनाच्या नियमाप्रमाणे पहिल्याच दिवशी मुलांना नवीन पाठ्यपुस्तकांची वाटप ही झाले.
काही हौशी पालकांनी तर मुलांना लागणारे वही,पुस्तक,पेन,कंपास यासारख्या लागणाऱ्या गोष्टी मुलांना देऊ घातल्या.
आपली मुलं खूप शिकावी,मोठी व्हावीत आपल्या सोबतच शाळा,समाज,गावाचेही नाव व्हावे हीच सर्वांची अपेक्षा असते.
त्यांची ही अपेक्षा नक्कीच स्वाभाविक आहे आणि ती असायलाच हवी.....
⭕आजचा अभ्यास काय???⭕
सरांनी?मॅडमनी आज कोणता अभ्यास दिला?
खरंतर नवीन तंत्रज्ञान माणसाच्या इतक्या सोयी केल्या आहेत की त्यामध्ये आपली शाळा का मागे असावी?
मुलगा शाळेत आला की लगेच व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी आणि सुरू झाले नियम व अटी आणि मुलांना मोबाईल मागण्याची त्वरित संधी....
ही मुलं अशी संधी कसे बरे सोडतील?घरी येताच प्रथम मुलं आई-वडिलांना आमच्या बाईंनी काय अभ्यास दिला? मला मोबाईल तो मोबाईल दे..
रोज शाळेत जाण्यापेक्षा अथवा माझा मुलगा काय करतो यासाठी नक्कीच यासारख्या सोशल मीडियाचा वापर 100% योग्यच.
पण आपणच मुलांना सांगतो की मोबाईलचा वापर कमीत कमी करावा मोबाईल वापरू नये,याचा वापर अति प्रमाणात झाल्यास मुलांच्या मानसिक आरोग्यावर दीर्घ परिणाम होऊ शकतो.
यामध्ये डोळ्यांवरील ताण,झोप न लागणे,नैराश्य,चिंता,लक्ष केंद्रित न होणे यासारखे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात.
आणि मुलांना मोबाईल दिलाच नाही तर दुसऱ्या दिवशी अनेक कारणांचा शिक्षकांवर भडीमार असतो, यामध्ये...
1.मोबाईल घरीच नव्हता
2.आई-बाबा बाहेर गेले होते
3.नेट संपला होता
4.बाबा कामावरून उशीर आले होते
5.दीदी ने मोबाईल दिलाच नाही
6.मोबाईल साधाच आहे
7.आमच्या मोबाईलवर उशिरा अभ्यास आला
8.अभ्यास समजलेच नाही
अशीच अनेक कारणे समोर येत असतात.
मग आमचे गुरुजी येतात रागाला.का तर जीव तोडून विद्यार्थ्यांना समजावून सांगून ही अभ्यास का करू नये?
या अभ्यासावरून तर माझे विद्यार्थी कुठे कमी पडत आहेत,याचा ते अनुमान लावत असतात आणि त्यावर उपाय शोधत असतात.
मुलं तीन ला सहा तर कधी सहा ला तीन करतात यावरच सुरू होतो आमचा कृती संशोधनाचा विषय त्यातच पालकांना अभ्यासाची विचारणा केल्यास पालकांचे उत्तर येण्यास सुरुवात होते...
1.मुलांना अभ्यास समजलाच नाही
2.कळलच नाही
3.तुमची पद्धतच खूप कठीण असते
4.गावाला गेलो होतो
5.चुकून राहिला असेल
6.त्यात काय एवढं
7.त्याला एवढं आलं असतं तर आम्ही शाळेला पाठवलं असतं का
8.तुम्ही नेहमी आमच्याच मुलांची चुका कसे काढता बरे
या गोष्टींचा शेवटी खापर फुटतो आमच्या मोबाईलवर.
आपल्या वेळेस यासारखी साधनं नव्हती पण ती साधन वाईट पण नाहीत आपण त्या वस्तूंचा वापर कसा करतो यावर निश्चितच बरे वाईट अवलंबून असते.
शाळेतील विद्यार्थ्यांचा एक मिनिट ही वाया जाऊ नये याची सर्व काळजी गुरुजी घेत असतात आणि जर
घरचा अभ्यास लिहिण्यास जर आमचे 20 ते 25 मिनिट जाणार असतील तर आमचे गुरुजी ते नक्कीच सहन करू शकणार नाहीत.यावर उपाय काहीतरी असायलाच हवा जेणेकरून मुलं अभ्यास पण करतील आणि मोबाईलचा नावाने गोंधळ पण नको.......
🔴 होय हीच ती अभ्यासाची माझी वही:-
आपणा सर्वांना माहीतच असेल दैनंदिनी रोज निशी यासारखे जर आपण आपल्या पाल्याचे एक अभ्यासाची वही बनवली तर शिक्षकांनी दिलेला घरचा अभ्यास आपण स्वतः एका वहीत लिहून ठेवलं तर तो अभ्यास मुलांनाही समजेल आणि मुलांचा मोबाईलशी संपर्क नक्कीच कमी होत जाईल.
आपली मुले दिलेला गृहपाठ स्वाध्याय वेळेवर करतात की नाही यावरही कारणमीमासा होईल.
यामुळे मुलांच्या आवडीनिवडी समजतील.
त्यांच्या येणाऱ्या अडचणी समजतील. त्यावर मार्ग काढून मुलं नक्कीच पुढे जातील आणि बाईंचा अभ्यास नव्हता या कारणापासून विद्यार्थी दूर राहतील मुलं शाळेतून घरी येण्याच्या अगोदर आजचा अभ्यास पाहतील आणि ते आपल्या कामाला लागतील..
खरंतर मुलच आपले विश्व आहे ते आपल्या सोबत भारताचे भविष्यही आहेत मुलांचा स्वभाव नक्कीच खोडकर असतो पण सर्व गोष्टींवर चादर टाकून चालणार नाहीत जर आपल्या मुलांचं करिअर घडवायचं असेल तर पालक म्हणून आपणही जबाबदारी घेतली पाहिजे फक्त शाळेवर जबाबदारी सोडून चालणार नाही.
पूर्वीही कित्येक विद्यार्थी घडले आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने येणारी पुढील पिढी ही नक्कीच घडेल. फक्त आपल्या स्वतःवर विश्वास असला पाहिजे आणि आपल्या गुरुजींची प्रेरणा....
नक्कीच होय हीच ती अभ्यासाची वही आवडली असेल अशी अपेक्षा करतो याविषयी आपले मत नक्कीच कळवा
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
राहुल दत्तात्रय म्हमाणे
उपक्रमशील शाळा पुरस्कृत
प्राथमिक विद्यामंदिर बार्शी
8482824588
No comments:
Post a Comment