हातकणंगले : मदरसामध्ये शिक्षण घेत असलेल्या फैजान नाजीम
(वय 11 रा.बिहार ) या परप्रांतीय अल्पवयीन मुलाचा 14 वर्षीय परप्रांतीय अल्पवयीन मुलाने विजेचा शॉक देऊन खून केला.
सोमवारी पहाटे फैजानचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिस तपास व फॉरेन्सिक अहवालात त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी अल्पवयीनला ताब्यात घेतले आहे.
याबाबतची फिर्याद विनोद सुरेश पिलाणे यांनी दिली आहे.
आळते येथील निजामियाँ मदरसामध्ये सुमारे 80 ते 90 मुले धार्मिक शिक्षण घेतात.
तेथेच राहून फैजान नाजीम (मूळ बिहार) शिक्षण घेत होता. सोमवारी पहाटे तो उठला नसल्याने त्याला हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले;मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.
त्याच्या हातापायावर भाजल्यासारख्या जखमा दिसल्याने त्याचा मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला.
तपासणी व शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृत्यू विजेचा शॉक लागून झाल्याचे स्पष्ट झाले.
यावरून पोलिसांनी तेथे शिकत असलेल्या अन्य मुलांकडे कसून चौकशी केली. चौकशीत मदरसामध्ये शिक्षण घेत असलेल्या बिहार येथीलच 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने विद्युत प्रवाहित वायरीने शॉक देऊन त्याचा खून केल्याचे कबूल केले.
हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
⭕आळते येथील धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये १६ जूनच्या पहाटे पाच वाजता अल्पवयीन विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हातकणंगले पोलिसांनी संस्थेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर सोमवारी रात्री ११ वाजता गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले.
याच शैक्षणिक संस्थेतील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने झोपलेल्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिक वायरच्या साहाय्याने शॉक देऊन खून केल्याची कबुली दिली. संस्था बंद पडून घरी जायला मिळावे, यासाठी गुन्हा केल्याची कबुली मुलाने पोलिस आणि मानसोपचार तज्ज्ञांसमोर दिली.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕अधिकारीही थक्क:-
अल्पवयीन मुलाला बोलते करण्यासाठी बालविकास अधिकारी आणि बाल उपचारतज्ज्ञांना बोलावले. यानंतर अल्पवयीन मुलगा बोलता झाला. अतिशय क्रूर पद्धतीने त्याने मित्राचाच खून केला.
विशेष म्हणजे या घटनेत त्याच्यासह
आसपास झोपलेल्या मुलांनाही धोका होता.
मात्र,याचा कोणताही विचार न करता त्याने विजेचा शॉक देऊन मित्राचा खून केल्याचे ऐकताच अधिकारी थक्क झाले.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕बाल हक्क आयोगाकडे तक्रार:-
कोल्हापुरातील बाल हक्क कार्यकर्ते अतुल देसाई यांनी मंगळवारी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार केली. धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये बालकांच्या हक्कांचे उल्लंघन होते. राज्यातील अशा प्रकारच्या सर्वच संस्थांची तपासणी करून बालकांची होणारी पिळवणूक थांबवावी तसेच आळते येथील घटनेचा सखोल तपास करून सत्य समोर आणावे,अशी मागणी त्यांनी केली आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕खून करून झोपी गेला:-
मदरसामधून बाहेर पडण्यासाठी फैजान नाजीम याला झोपेत असताना रविवारी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास विद्युत वायरीने शॉक दिला.
त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर खुनी मुलगा झोपी गेला. सोमवारी पहाटे हा प्रकार निदर्शनास आला.
No comments:
Post a Comment