Monday, 5 February 2024

सहज व सोपे नाविन्यपूर्ण उपक्रम-भरलेले वहीच्या पुठ्यापासून फोटो फ्रेम तयार करणे

⭕ सहज व सोपे नाविन्यपूर्ण उपक्रम-भरलेले वहीच्या पुठ्यापासून फोटो फ्रेम तयार करणे 
⭕साहित्य-दोरी,घोटीव कागद मणी, आपले आवडते फोटो,डिंक,लेस,कात्री,सुई इ.
विद्यार्थिनी:- दुर्वा गुळमे चौथी-अ

कृती-
१.प्रथम एक भरलेल्या वहीचे पुठ्ठा घ्या.
२.पुठ्ठ्याच्या मधोमध आपले आवडते फोटो चिटकून घ्या.
३.नंतर कात्रीच्या साह्याने घोटीव कागदाला फुलाच्या आकाराने कापा/कट करून घ्या.
४.फुलांचा आकार कट करताना तीन ते चार रंगाचा कागद तरी चालेल.
५.वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे ते फुल चिटकून घ्या.
६.सुईचा वापर करून त्याला वरच्या बाजूस दोन छिद्र पाडा.
७.नंतर त्यास दोरी बांधा.
याप्रमाणे आपलेही फोटो फ्रेम तयार होईल आपणही नक्की करा व आमच्या या 8482824588 नंबरला अवश्य पाठवा.
८.हे उपक्रम जास्त खर्चिक नसल्याने सहज आपल्यास राबविता येईल.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
उपक्रमशील शाळा पुरस्कृत 
प्राथमिक विद्या मंदिर बार्शी

No comments:

Post a Comment