Tuesday, 27 September 2022

शाळा आणि पालकांनी घ्यावी खबरदारी मुलं पळवून नेणारी टोळी ही अफवाच- पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेमुलांना पळवून नेणारी टोळी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरत आहे अशी अफवा सोशल मीडियातून दूरवर पसरली आहे अनोळखी व्यक्तीकडे नागरिक संशय आणि पाहत आहेत पण,मुलांना पळवून नेणारे टोळी फिरत असल्याचे अफवा असल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे,तरीही शाळा व पालकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये जवळपास दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत जिल्हा परिषदेच्या २७८९ शाळा आहेत बहुतेक मुले स्वतःहून चालत शाळेतून घरी जातात पणमुलांना पळवून नेणाऱ्या टोळीच्या अफवेनंतर काही पालकांनी मुलांना घरीच ठेवले पसंत केले आहे.पण अफवा असली तरी देखील पोलिसांनी शाळांना खबरदारी सूचना केल्या आहेत शाळेत आलेल्या मुलाला न्यायला कोणी अनोळखी व्यक्ती किंवा महिला आल्यास संबंधित शाळांनी संबंधित पालकांना कॉल करून त्या व्यक्तीची खात्री करावी आणि मगच मुलाला त्याच्याकडे सोपवावे शाळा व परिसरात संशयित व्यक्ती आढळल्यास किंवा फिरताना दिसल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे कोणीही कायदा हातात घेऊ नये संशयीताला धोका होईल असे कृत्य करू नये.📌मुलांना समजावून सांगा या गोष्टी-१)मुलांमध्ये भीती निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्याशी योग्य संवाद साधा २)मुलांना परस्थिती समजावून सांगा की अनोळखी व्यक्तीशी बोलू नको ३)अनोळखी व्यक्तीने चॉकलेट खाऊ मोबाईल किंवा व्हिडिओ गेम दिला तरी घेऊ नको.४)जर कोणी तुम्हाला हात लावला किंवा धरले तर आरडा ओरडकर ५)रस्त्याने चालत चालताना पालकांचा हात सोडू नको पुढे मागे पळू नकोपालकांनी अशी घ्यावी काळजी-१)मुलांच्या मनात भीती निर्माण होईल अशी कोणतीही गोष्ट विद्यार्थ्यांना सांगू नये.२)गर्दीच्या ठिकाणी मुलांना घेऊन जाऊ नये.📌पोलिसांचे आवाहन पडताळणी- १)खात्री केल्याशिवाय कोणती गोष्ट विनाकारण कोणालाही पाठवू नये २)कोणतेही व्हिडिओ व्हायरल करू नये.३)शंका असल्यास स्थानिक पोलिसांची संपर्क साधावा४) शालेय परिसरात संशयास्पद व्यक्ती आढळल्यास शाळा प्रशासन अथवा स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधा अथवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधा📌जिल्ह्यात मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याची कोणतेही रेकॉर्ड पोलिसात दिसत नाही सोशल मीडियातून अफवा पसरवण्यात आली आहे.तरीपण पालकांनी व शाळांनी सतर्कता बाळगावी पालकांनीच मुलांना आणायला शाळेत जावे शाळेंनाही पालकांऐवजी कोणी दुसरा अनोळखी मुलाला न्यायला आला तर संबंधित पालकांकडे याची खात्री करावी-तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण(सौजन्य-सकाळ वृत्तपत्र सोलापूर)

No comments:

Post a Comment