Thursday, 22 September 2022

न.पा.शिक्षण मंडळ बार्शी गुणवंत शिक्षक व उपक्रमशील शाळा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न📚📚📚📚📚📚📚📚📚शिक्षक दिनाचे औचित्य साधून आज न.पा.शिक्षण मंडळ बार्शी यांच्यावतीने बार्शी शहरातील गुणवंत शिक्षक आणि उपक्रमशील शाळा पुरस्कार देण्यात आला यंदा यावर्षी हे पुरस्कार मा.आमदार श्री.राजेंद्र विठ्ठल राऊत (बार्शी विधानसभा मतदारसंघ) व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्रीमती अमिता दगडे-पाटील (मुख्याधिकारी नगरपरिषद बार्शी)प्रमुख वक्ते-गणेशजी करे-पाटील करमाळा मीनाक्षी वाकडे-मुख्य लेखापाल आणि प्रशासन अधिकारी न.पा.शिक्षण मंडळ बार्शी मा.श्री.अनिल भगवान बनसोडे व पर्यवेक्षक संजय पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक २२/०९/२०२२ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पार पडला.या प्रसंगी मा.आमदार बोलताना म्हणाले की शिक्षकांना गुरुचे स्थान आहे.आई-वडीलानंतर शिक्षक हे विद्यार्थ्यांचे आई-वडील असतात लवकरच न.पा.साठी ४ आधुनिक शाळेची स्थापना करणार असल्याचे ते सांगितले गोरगरीबांच्या मुलांना चांगली शिक्षण मिळावे यासाठी आपण पुढे ही आपण सर्वांनी प्रयत्न करणार असे ते सांगितले.मा.प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे साहेब गुणवंत शिक्षकांना शुभेच्छा देताना म्हणाले की आजचा दिवस खूप महत्त्वाचे आहे.आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या दिवशी शिक्षकदिन कार्यक्रम साजरा झाला याचा मला अभिमान वाटतो सर्व सन्मानपात्र शिक्षक यांचे अभिनंदन केले.प्रमुख वक्ते गणेशजी करे-पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना डॉ.अब्दुल कलाम यांची एक कथा सांगितले की ज्या वेळी त्याचे इंजिनिअरिंग ला नंबर लागला ते हरणासारख्या उड्या मारत होते हे पाहून त्याच्या आई-वडील यांच्या डोळ्यात पाणी आले त्या वेळेस त्यांची बहीण माहेरी आली होती ऍडमिशन ला पैसे नव्हते त्या वेळेस त्यांची बहीण म्हणाली की मला लग्नाला दिलेले सोने मोड आणि फी भरा हे सोने तुझ्या शाळेसाठी नाहीतर तू भारताचा दागिना झाला पाहिजे म्हणून दिले आहे.सर्व शिक्षकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.मुख्यकार्यकारी अधिकारी मा.श्रीमती अमिता दगडे पाटील यांनी या सन्मान सोहळा विषयी बोलताना म्हणाले की बार्शीतील सर्व शिक्षकांचे कार्य उत्कृष्ट व कौतुकास्पद आहे.सर्व शिक्षकांनी वाचन व मनन करावे असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे आभार श्री.अभिमन्यू सातपुते सर यांनी केले.📕📗📘📙📕📗📘📙

No comments:

Post a Comment