Monday, 3 April 2023
ब्रेकींग ! सोलापूरचे माध्यमिक शिक्षण अधिकारी सुलभा वटारेंचा तडकाफडकी काढला पदभार
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांचा तडकाफडकी पदभार काढण्यात आला.
असून त्यांच्या जागेवर महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी जावेद शेख यांच्याकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे, त्याबाबत स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अधिकृत माहिती दिली.
माध्यमिक शिक्षण विभागात मागील आठवड्यात टप्पा अनुदानाचा बराच गोंधळ उडाला अजूनही काही शिक्षक त्रुटी पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये बसून असलेले दिसून येत आहेत.
जिल्हा परिषदेत मागील काही दिवसात उडालेला गोंधळ आणि हे कामकाज पाहताना प्रभारी शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांच्या कामावरही प्रशासनाने नाराजी व्यक्त केली होती
त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी तात्काळ वटारे यांचा पदभार काढत महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी जावेद शेख यांना पदभार दिला आहे.
जावेद शेख यांच्याकडे पदभार देण्यामागील कारण विचारले असता शेख यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून कामकाज केले आहे, तो अनुभव पाहता त्यांच्याकडे शिक्षण अधिकाऱ्याचा पदभार देता येतो अशी माहिती मिळाली. शेख यांना काम करत असताना प्राथमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी संजय जावीर यांना सहकार्य करण्याच्या सूचना स्वामी यांनी दिल्या आहेत.
दरम्यान महिला व बालकल्याण विभागांमध्ये लहान मुलांच्या पोषण आहारात कोट्यावधीचा घोटाळा केल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील आणि सदस्य त्रिभुवन धाइंजे यांनी जावेद शेख यांच्यावर सभागृहात केला होता त्यामुळे अशा घोटाळ्याचे आरोप झालेल्या अधिकाऱ्याकडे शिक्षण विभागाचा कारभार गेल्याने त्यांच्या कामकाजावर सीईओ स्वामी हे बारीक लक्ष ठेवून असणार असल्याचे समजले.
Sunday, 2 April 2023
Saturday, 1 April 2023
प्रेरणादायी-याला म्हणतात जिद्द ;तीन महिने वाट पाहत होते संधीची
विद्यार्थ्यांनी कोणाकडूनही चॉकलेट अथवा खेळण्याची वस्तू घेऊ नये व कोणी सोबत चल म्हटले तरी ते अनोळखी असतील, तर त्यांच्यासोबत जाऊ नये.
तसेच अनोळखी व्यक्तींच्या गाडीला हात करून शाळेत जाऊ नये. फक्त घरातील किंवा आपल्या नातेवाईक शेजारी व ओळखीचे कोणी असेल तर त्यांच्या सोबत जावे.
शाळेत जाताना शाळेच्या आवारात व घराच्या बाहेर खेळताना दक्षता व काळजी घेण्याचे आवाहन यावेळी केले.तसेच नागरीकांनी तरुणांनी, पालकांनी व शिक्षकांनी याबाबत जागृत राहावे,विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांना घाबरून न सोडता दक्षता व काळजी घ्यावी अशा सूचना ही यावेळी पोलीस निरीक्षक यांनी केल्या