Saturday, 13 June 2026

राष्ट्राप्रती कृतज्ञ भावनेतून स्वयं प्रेरणेने नियमित रक्तदान प्राथमिक शिक्षक निलेश ठोके यांचा सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा एक वेगळा प्रयत्न

रक्तदानाविषयी जनजागृती होणे काळाची गरज असुन रक्तदान हे समाजाप्रती दायित्वाच्या विचारातून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रभक्ती जोपासण्याचे एक माध्यम असु शकते यात काही दुमत नाही...नांदेड येथे आयोजित राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करत नाव उंचावणारे श्रीनगर, नांदेड येथे रक्तदान करणारे निलेश ठोके हे धुळे जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले राज्यातील एकमेव प्राथमिक शिक्षक ठरले आहेत.. नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई या रेल्वे स्थानकात अगदी ज्या ठिकाणी क्रूरकर्मा पाक दहशतवादी अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी रेल्वे प्रवाश्यावर अचानक हल्ला करून अमानुषपणे अनेकांचा जीव घेतला होता त्याच ठिकाणी दि 25 मे रोजी 'उत्कृष्टतेतुन विश्वासासह सेवा' या ब्रीदानुसार देशभरातील लाखों रुग्णांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या लोकमान्य टिळक म्युन्सिपल सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सायन मुंबई आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात प्रवाश्याना करण्यात आलेल्या आवाहनानुसार शेकडो रक्तदात्यांनी स्वेच्छेने आणि स्वयंप्रेरणेने रक्तदान केले... याप्रसंगी मुंबई शहरासह इतर विविध ठिकाणाहून 50 हून अधिक स्वयंसेवकांनी श्रमदान केले.... धुळे जिल्ह्यात शांतीलाल मुथा फौंडेशन व महाराष्ट्र शासन मार्फत राबविण्यात आलेल्या मूल्यवर्धन उपक्रमात डी आर जी सदस्य राहिलेले तसेच शिक्षण सेवेचे व्रत घेतल्यापासुन अनेकदा नियमित रक्तदान करत असलेले प्राथमिक शिक्षक निलेश ठोके यांनी या शिबिरामध्ये स्वयंप्रेरणेने रक्तदान करत वर्षातून किमान एकदा रक्तदान करण्याचा केलेला संकल्प पूर्ण केला. 
तसेच त्यांनी स्वयंप्रेरणे केलेल्या रक्तदानाबद्दल सायन येथील एल टी एम जी जनरल रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर पल्लवी डॉक्टर रीथ जॉन यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.. ते शिक्षक सेवेचे व्रत घेतल्याच्या अगोदरपासुन समाजात रक्तदान, अवयवदान याबाबत जागृती वाढावी यासाठी प्रयत्नशील आहेत..
केवळ एकदा रक्तदान केल्याने सुमारे 650 कॅलरी खर्च होतात तसेच काही प्रमाणात हृदयविकाराचा धोका कमी होण्यासह रक्तातील लोहाचे प्रमाण संतुलित राखले जाते असे रक्तदानाचे विज्ञान मान्य विविध शास्त्रीय फायदे असुन मानवी जीवनात आकस्मिक अपघाता सारख्या आणीबाणीच्या प्रसंगी तसेच शस्त्रक्रियांसाठी रक्ताची निकड भागवण्यासाठी रक्तदान हे अत्यंत श्रेष्ठदान मानले जाते.. महाराष्ट्रात महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी प्रसंगी तसेच राजकीय नेत्यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे परंपरा आहे. जगभरात दरवर्षी 14 जून रोजी 'जागतिक रक्तदाता दिवस' साजरा केला जातो.. रक्तदान एक जीव वाचवण्याच्या सर्वात मोठा उपक्रम ठरत असुन रक्तदान हे केवळ दान नाहीतर एखाद्याला नवजीवन देण्याची एक अनोखी अशी देणगी आहे...रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा संदेश जनमानसात बिंबवण्यासाठी आणि समाजात सर्व दूर रक्तदान सारख्या एक विधायक कामाचा परंपरेचा सर्वदूर प्रचार व प्रसार होण्यासाठी हे निलेश ठोके सदोदित प्रयत्नशील आहेत... राष्ट्रीय योगासन स्पर्धेत यश मिळविलेल्या योगपटु निलेश ठोके यांनी ह्यावर्षी धुळे जिल्हा परिषदेमार्फत आयोजित कला क्रीडा उत्सवात आपल्या योग सादरीकरनातुन आरोग्य विषयक जनजागृती करणारे योग नृत्य सादर करत प्रथम क्रमांक पटकावला असुन त्यासाठी त्यांना धुळे जि प चे कलास्नेही अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेश इंगळे यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांचा निसर्ग समिती द्वारा राबविण्यात आलेल्या जनजागृती पर्यावरण संवर्धन, जलयुक्त शिवार अभियान कार्यात सक्रिय सहभाग राहिला आहे.
पाकिस्तानी दहशतवादी कृत सीएसएमटी रेल्वे स्थानकात ज्या ठिकाणी शेकडो निष्पाप लोकांचे बळी गेले अगदी त्याच ठिकाणी जाऊन रक्तदान करण्याची ही कृती निश्चितच समाजात तरुणांवर्गा समोर एक आदर्शवत प्रयत्न असुन मुंबई दहशतवादी हल्ल्यातील ठार झालेल्या नागरिकांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल...
     असे म्हटले जाते की प्राथमिक शाळा ही सुसंस्काराचे सिंचन करविणारी बाग असते..आणि म्हणुनच सुसंस्कारक्षम पिढी घडविण्याची सुरुवात ही प्राथमिक शाळेपासुन होत असते..आणि अशाच प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर प्रामाणिकपणे आणि स्वयं प्रेरणे तुन केल्या जात असलेल्या ठोके यांच्या या प्रयत्नामुळे समाजाने, शासनाने अपेक्षिलेल्या उद्दिष्टे, हेतुना मूर्त रूप मिळेल यात काहीही शंका नाही..
शांतीलाल मुथा फाउंडेशन च्या मूल्यवर्धन प्रकल्प धुळे चे जिल्हा समन्वयक परवेज खाटीक तसेच साक्री तालुक्याचे समन्वयक श्री राजेंद्र पगारे यांनी मूल्यवर्धन चे DRG राहिलेले श्री ठोके यांचे रक्तदान विषयक कामाबद्दल समाधान व्यक्त केले असून
 अभिनंदन केले आहे..
तसेच 
 आजची तरुण युवा पिढी ही सोशल मीडियाच्या अवाजवी वापरामध्ये गुंतले असून वाढते बेरोजगारी व्यसनाधीनता अशा समस्येमुळे देखील त्रस्त आहे तरी अशा भरकटलेल्या युवा वर्गासमोर ठोके यांचा सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा एक समाज उपयोगी विधायक प्रयत्न निश्चितपणे प्रेरणादायी ठरणार आहे.

No comments:

Post a Comment