जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,सोलापूर यांचे कार्यालय
निवडणूक/कार्या//
जुने जिल्हाधिकारी कार्यालय सिद्धेश्वर पेठ सोलापूर
Email 10: dydoosolapur@gmail.com
दिनांक: २८/०४/२०२६
प्रति.
आयुक्त महानगरपालिका,
सोलापूर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
विषय: विशेष सखोल पुनरिक्षण २०२६ (SIF) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLC) यांना जणगणनेच्या कामातून सूट मिळणेबाबत.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
मा. भारत निवडणूक आयोगाच्या अधिनस्त निवडणूकांचे संचालन करणे तसेच त्यासाठी आवश्यक अत्तलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या तयार करणे व त्यांचे वेळोवेळी पुनरिक्षण करणे या निवडणूक विषयक कामासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० व लोकप्रतिनिधीत्य अधिनियम,१९५१ अन्वये तरतूदी करण्यात आलेल्या आहेत.
त्यानुसार भारत निवडणूक आयोगाच्या पर्यवेक्षण,नियंत्रण य आदेशानुसार मुख्य निवडणूक अधिकारी व अधिनस्त जिल्हा निवडणूक अधिकारी मतदार नोंदणी अधिकारी / निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून निवडणूक विषयक कामे केली जातात. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्राकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer) कार्यरत असून सोलापूर जिल्ह्यात एकूण ३७२३ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची नियुक्ती करण्यात आलेली असून सद्यस्थितीमध्ये आगामी होणाऱ्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेमार्फत मतदारांचे mapping चे कामकाज युद्ध पातळीवर सुरु आहे.
त्याअनुषंगाने मा. विभागीय आयुक्त सो.पुणे विभाग,पुणे यांनी दिनांक २७/०४/२०२६ रोजी ४० द्वारे आढावा घेवून जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) च्या कामासाठी नियुक्त आहेत, अश्या BLO यांना जनगणनेचे कामामधून वगळण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार सोलापूर शहरातील खालील मतदार संघातील ३३० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना। जनगणनेचे काम देण्यात आलेले आहे. त्यामुळे SIA च्या कामावर परिणाम होत आहे.
१. २४८ सोलापूर शहर उत्तर - ११२ BLO
२. २४९ सोलापूर शहर मध्य- १२० BLO
३. २५१ सोलापूर दक्षिण- ९८ BLO
तरी,मा.विभागीय आयुक्त सो. यांनी VC मध्ये दिलेल्या सूचनेनुसार शहरी भागामध्ये SIR सा नियुक्त वरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना जनगणनेच्या कामामधून वगळण्यात यावे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
(एस. कार्तीकेयन भा.प्र.से.) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
शिक्षक भारती संघटना ही कायम सर्व शिक्षक वर्गाच्या पाठीशी आहे त्यांच्यावर पडलेला कामाच्या तणावा मधून सुटका व्हावी याबद्दल आम्ही सतत पाठपुरावा करत होतो अखेर त्या पाठपुराव्यला आपल्या सर्वांचे मदतीने यश आले यापुढेही आम्ही आपल्यासाठी सदैव कार्य करत राहू...
श्री.सुजितकुमार काटमोरे
जिल्हाध्यक्ष खाजगी प्राथमिक माध्यमिक शिक्षक भारती सोलापूर.....
8793120483
No comments:
Post a Comment