मुंबई महाराष्ट्रातील अनेक भागात मोठा पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. मराठवाड्यात अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनामार्फत साहाय्य केले जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एक दिवसाचे वेतन देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळविले आहे. राज्यातील पूर परिस्थितीचे भान राखून मदतीचा निर्णय घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी कौतुक करुन आभार मानले.
राज्यात शिक्षकांची संख्या लाखोंमध्ये असल्याने,या निर्णयामुळे मोठा निधी उभा राहणार आहे.
या रकमेतून पुरग्रस्तांना तातडीची मदत व पुनर्वसनासाठी उपयोग केला जाणार आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
No comments:
Post a Comment