▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
खासगी अल्पसंख्याक शाळेत अनेक वर्षांपासून अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत समायोजन करावे,यासाठी झेडपीकडे हेलपाटे मारत होते.
त्या शिक्षकांच्या मागणीची दखल घेत जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम,प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी ५८ अतिरिक्त शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत तात्पुरते समायोजन केले आहे.
त्यामुळे त्या शिक्षकांनी सीईओ जंगम,शिक्षणाधिकारी शेख यांचे आभार मानले.
याबाबत अनेक शिक्षण संघटनांनीही पाठपुरावा केला होता.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
खासगी अल्पसंख्याक शाळेत अतिरिक्त असलेल्या शिक्षकांना खासगी शाळेकडून विविध प्रकारचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.
तसेच अतिरिक्त शिक्षक झाल्याने वेतन मिळण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या.
त्यामुळे खासगी अतिरिक्त शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत समायोजन करावे,अशी मागणी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी शेख यांच्याकडे भेटून केली होती.
त्याची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या शिक्षकांचे समायोजन करुन त्यांची जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळेवर तात्पुरती नियुक्ती केली आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕जि. प. शाळेस मिळाले शिक्षक----
जिल्हा परिषदेच्या बऱ्याच शाळेत शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यातच खासगी अल्पसंख्याक शाळेतील ५८ शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत समायोजन झाले आहे.
त्या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शाळेवर नियुक्ती दिल्याने जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना शिक्षक मिळाले आहेत.
त्यामुळे शाळेची गुणवत्ता वाढ होण्यास मदत होणार आहे.
⭕तालुकानिहाय शिक्षकांची संख्या-----
माळशिरस १५,
सांगोला १३,
अक्कलकोट-१३,
दक्षिण सोलापूर-६,
पंढरपूर- ६,
मोहोळ-३,
मंगळवेढा-२,
एकूण - ५८
दैनिक पुढारी
सोलापूर
संघटनेच्या मागणीला अखेर मिळाले यश--
अल्पसंख्यांक खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची समायोजन शासन आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये करण्यात यावे.
अशा मागणीचे निवेदन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक हारुन अत्तार यांना दिल्याची माहिती डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण यांनी केली होती.
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना,युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाच्यावतीने हे निवेदन शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले.
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यतेनुसार
अल्पसंख्यांक खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची समायोजन प्रक्रीया १५ मार्च २०२४ च्या शासन आदेशानुसार राबविण्यात यावी.
मराठी,कन्नड व उर्दु माध्यमातील अतिरिक्त ठरलेल्या ५४ शिक्षकांचे समायोजन खाजगी अल्पसंख्यांक शाळेत करण्यात आले आहे.
अल्पसंख्यांक शाळांना अतिरिक्त शिक्षकांना रुजु करुन अद्याप शिक्षकांना रुजु करुन घेण्यात आलेले नाही.
त्यामुळे शासननिर्णयातील पुढील टप्यानुसार या सर्व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये करण्यात यावे.
अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनावर सुनिल चव्हाण,आप्पाराव इटेकर,आप्पासाहेब पाटील,अ.गफुर अरब यांनी याविषयी आवाज उठवला होता अखेर त्यांच्या लढ्याला यश आले.
No comments:
Post a Comment