छत्रपती संभाजीनगर येथून क्लासमध्ये मोबाईल वापरत असल्याचे त्याच्या आई- वडिलांना कळविल्याने,घरी गेल्यानंतर आई-वडील रागावतील,या भीतीमुळे तेथून निघून आलेल्या अल्पवयीन मुलाला माहिती मिळताच अवघ्या २० मिनिटांत मंद्रूप पोलिसांनी नांदणी येथून ताब्यात घेतले.
छत्रपती संभाजीनगर
येथील अल्पवयीन मुलाचा कोणीतरी अपहरण केल्याचा गुन्हा मंगळवारी (२८ नोव्हेंबर) वेदांत पोलिस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आला होता.
वेदांत पोलिस ठाण्यातील निरीक्षक गिरी यांनी सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक नामदेव शिंदे यांना संपर्क साधून अल्पवयीन मुलगा हा कोणत्यातरी वाहनातून जात असून,तो नांदणी (ता. द. सोलापूर) येथे असल्याची माहिती दिली.
सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे
निरीक्षक नामदेव शिंदे यांनी तत्काळ मंद्रूप पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांना माहिती दिली असता,करपे यांनी ही हकिकत मंद्रूप पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत हुले यांना समक्ष कळवून क्षणाचाही विलंब न करता गुन्हे
प्रकटीकरण शाखेचे पोलिस शिपाई काळे व शेख यांच्यासह त्या बालकाचा शोध घेण्याकरिता पथकाने नांदणी (ता. द. सोलापूर)
🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓
🟣मंद्रूप पोलिसांची यशस्वी कामगिरी-
तो मुलगा गणगौर राजस्थानी हॉटेल समोरून एका ट्रकमध्ये बसून कर्नाटकच्या दिशेने निघाला होता.
तो ट्रक थांबवून अल्पवयीन मुलास सुखरूप ताब्यात घेतले.
ही कामगिरी मंद्रूप पोलिसांनी अवघ्या २० मिनिटांत पार पाडली.
अल्पवयीन मुलाला सुखरूप ताब्यात घेतल्याबाबत वेदांत पोलिस ठाण्यास (छत्रपती संभाजीनगर) कळविण्यात आले.
तेथील पोलिस ठाण्याचे पथक व वडिलांच्या ताब्यात मुलाला देण्यात आले.
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
🟣संबंधित मुलाबाबत माहिती मिळाल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता अवघ्या २० मिनिटांत त्या बालकाचा शोध घेतला.
आणखीन १० मिनिटे जरी उशीर झाला असता तर तो मुलगा नांदणी (ता. द. सोलापूर) पासून अवघ्या किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कर्नाटक राज्यात निघून गेला असता. तेव्हा त्याचा शोध घेणे जिकिरीचे झाले असते.
- अमितकुमार करपे,पोलिस उपनिरीक्षक,मंद्रूप पोलिस ठाणे
📡📡📡📡📡📡📡📡📡📡
सकाळ वृत्तसेवा सोलापूर
No comments:
Post a Comment