Friday, 29 July 2022
नगर पालिका प्राथमिक शिक्षण मंडळ बार्शी शिक्षक शिक्षण परिषद आनंददायी व खेळीमेळीत पार पडले दि.29/07/2022 शुक्रवार बार्शी शहर:-बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालय,बार्शी या ठिकाणी आज दिनांक 29/07/2022 शुक्रवार मासिक शिक्षण परिषद न.पा.शिक्षण मंडळ बार्शी चे प्रशासन अधिकारी श्री. अनिल बनसोडे व पर्यवेक्षक श्री. संजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे सुरुवात राष्ट्रगीत पासून सुरू करण्यात आले.आलेल्या सर्व शिक्षकांचे स्वागत पाटील सर यांनी केले निपुण भारत अभियान काय आहे कोणत्या मूलभूत भाषा व गणित क्षमता विद्यार्थ्यांमध्ये रुजवले पाहिजेत.अंगणवाडी बालवाडी विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिक्षण द्यावे निपुण मित्र यांचे शाळा प्रशासनात कशी मदत घेता येईल.विद्यार्थ्यांना शाळेत कशा प्रकारे आकर्षीत करू शकतो याची माहिती प्रस्तावनेत श्री.कांबळे सर यांनी केलीभाषा-शिकवण्यासाठी जुन्या गोष्टी कशा वापरले पाहिजे मातृभाषेतून शिक्षण किती महत्वाचे आहे याविषयी माहिती ढेंबरे सर यांनी सांगितले. गणित या विषयाचा व्यवहारात मुलांनी कसा वापर करावे यासाठी नवीन कल्पना वापरावे मुलांचे गणितीय क्रियांवर दृढीकरण कसे करावे मुलांना बाजारात गेल्यावर कोणत्या गोष्टी पाहावे.गणितामध्ये 'पेक्षा' या शब्दाचे महत्व याविषयी मार्गदर्शन श्री.उमेश कोले सर व सौ.मांजरे मॅडम यांनी केले.दशसूत्री-व्हिजन 2022-23 पालक-शिक्षक-विद्यार्थी यांचा सहभाग मुलांना शिक्षणातील नवीन गोष्टी यांचा ताळमेळ कसा करावा त्यांच्या अंगातील कलेला प्रोत्साहन कसे द्यावे उपस्थिती कशी वाढवावी या विषयी पाटील सर यांनी केलीस्पर्धाचे युगात दमदारपणे पावले टाकावीत प्रत्येक शिक्षकांनी आपले स्वतःचे स्थान कोठे आहे याची पडताळणी करावी नवीन गोष्टी आत्मसात कराव्या शिक्षक म्हणजे माहिती देणाऱ्याची संस्कृती हा जप पुढेही असाच चालू ठेवावा असे आवाहन पर्यवेक्षक श्री.संजय पाटील यांनी केले.समारोपा मध्ये बोलताना प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांनी शिक्षकांना येणाऱ्या अडचणींवर मात करून नवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे मुलांना शिकवताना त्याची गती लक्षात घेतले पाहिजे मुलांचे बारकावे लक्षात घेतले पाहिजे मोबाईलचा वापर जबाबदारी ने करावा असेशिक्षकांना आवाहन करण्यात आले*हे शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी प्रशासन अधिकारी,पर्यवेक्षक,शिक्षक व निपुण टीम यांनी मेहनत घेतली.*आभार प्रदर्शन श्री.अभिमन्यू सातपुते सर यांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment