Tuesday, 28 June 2022

मार्च-एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परिक्षेची गुणपत्रिका सोमवार ०४ जुलै २०२२ रोजी मिळणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत घेतले जाणारे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीच्या परीक्षेची गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शवणारे शालेय अभिलेख यांचे वाटप माध्यमिक शाळांना सोमवार दिनांक ०४ जुलै २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय मंडळामार्फत करावयाचे असून त्या दिवशी दुपारी ३.०० वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप माध्यमिक शाळे मार्फत करावयाचे आहे,त्यानुसार विभागीय मंडळ स्तरावर नियोजन करावे सदर बाब आपल्या विभागीय मंडळ कार्यक्षेत्रातील संबंधित माध्यमिक शाळांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावी.व त्याची प्रत या कार्यालयास पाठवण्यात यावी.यासंबंधीचे पत्र माननीय डॉ.अशोक भोसले सचिव राजमंडळ पुणे यांच्यामार्फत देण्यात आले आहे

No comments:

Post a Comment