Tuesday, 28 March 2023

पॅन-आधार लिंकिंगला जून पर्यंत वाढली मुदत

पॅन-आधार लिंकिंगला 30 जून पर्यंत मुदत वाढ
केंद्र सरकारने सतत आवाहन करूनही अद्याप 20% नागरिकांनी आपले पॅन कार्ड आधारची लिंक केले नसल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र शासनाकडून 31 मार्च 2023 आधार पॅन लिंक करायची अंतिम तारीख देण्यात आली होती.

ही मुदत संपायला तीन दिवस शिल्लक असतानाच आज पुन्हा आधार-पॅन लिंक करायची मुदत वाढविण्यात आली आहे.
त्यामुळे ज्यांनी अद्याप आधार पॅन लिंक करावयाचे आहे त्यांना दिलासा मिळाला आहे.
पॅन कार्ड आधारची लिंक करण्याची अंतिम मुदतवाढ वाढविण्यात आली आहे हे करण्यासाठी 31 मार्च ही अंतिम तारीख देण्यात आली होती.
पण आता ती पुन्हा तीन महिन्यांनी वाढवण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता याची तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे

Monday, 27 March 2023

आजच्या महत्वाच्या बातम्या मंगळवार दिनांक २८ मार्च २०२३

NCERT चे नवे शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमात होणार बदल

NCERT Books Revised: एनसीईआरटीच्या सर्व श्रेणींच्या अभ्यासक्रमात बदल होणार असून नवीन पाठ्यपुस्तक शैक्षणिक धोरणानुसार हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण खात्याने दिली आहे.
यामुळे आता एनसीईआरटीच्या सर्व पुस्तकांमध्येही बदल होणार आहे.
 पुढील शैक्षणिक धोरणांपासून म्हणजे 2024-25 पासून हा अभ्यासक्रम लागू केली जाणार असल्याची माहिती आहे. 

शिक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन पाठ्यपुस्तके 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून लागू केली जाण्याची शक्यता आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार या अभ्यासक्रमात बदल केला जाणार असून त्यावर या आधीपासूनच काम सुरू करण्यात आलं आहे.
कोरोना काळात डिजिटल शिक्षणाचं महत्व समोर आलं.
 त्याच आधारावर सर्व नवीन 
पाठ्यपुस्तके एकाच वेळी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली जातील जेणेकरून कोणीही त्यांना डाउनलोड करू शकेल
 तसेच पाठ्यपुस्तके नियमितपणे अद्ययावत केली जातील, त्यासाठी एक 
इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क विकसित केलं जाणार आहे. 
Abp

Saturday, 25 March 2023

जुन्या पेन्शन साठी एन एफ आय आर चा संपाचा इशारा;

जुन्या पेन्शन साठी एन एफ आय आर चा संपाचा इशारा;रेल्वे कर्मचारी आक्रमक

केंद्र सरकारने भारतीय रेल्वे लागू केलेली नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी.
जर रेल्वे मंत्रालयाने कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली नाही
तर लवकरच 25 लाख रेल्वे कर्मचारी संपावर जातील.
असा इशारा नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेचे महामंत्री डॉक्टर एम राघवैय्या यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला आहे.

 सेंट्रल रेल्वे मजदूर संघाची 54 वे वार्षिक अधिवेशन मुंबईत पार पडले.
यावेळी नवीन पेन्शन योजना महागाई भत्ता रिक्त पदे भरणे खाजगीकरण आउट सोर्सिंग आणि रेल्वे 
कामगारांच्या इतर प्रलंबित मागण्याबाबत 16 प्रस्ताव पारित करण्यात आले.
सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे हे वार्षिक अधिवेशन 23 ते 25 मार्च 2023 या कालावधीत मुंबईत पार पडले.
यामध्ये मध्य रेल्वेच्या पाचही विभागातील हजारो रेल्वे कर्मचारी सहभागी झाले होते.अधिवेशनात प्रमुख अतिथी म्हणून राघवैय्या यांची उपस्थिती होती.

तीन दिवसीय अधिवेशनात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या राष्ट्रीय पेन्शन योजना मुख्य आहे यावर सखोल चर्चा करण्यात आली एनपीएस योजना 1 जानेवारी 2004 रोजी आणि त्यानंतर रेल्वेमध्ये भरती झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे.
 ही योजना हटवण्यासाठी आणि जुनी पेन्शन पुन्हा लागू करण्यासाठी निर्णय संघर्ष करण्याची ब्ल्यू प्रिंट यावेळी तयार करण्यात आली.
सरकारवर सर्वतोपरी दबाव आणला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आजच्या महत्त्वाच्या बातम्या रविवार दिनांक २६ मार्च २०२३

Friday, 24 March 2023

माजी सैनिक श्री.परमेश्वर शरणप्पा धाये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

माजी सैनिक श्री.परमेश्वर शरणप्पा धाये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

माजी सैनिक परमेश्वर शरणाप्पा धाये वय-६५, यांचे शनिवारी दि.२५ मार्च २०२३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
 २४ मार्चला अशक्तपणामुळे आश्विनी येथे उपचारासाठी दाखल झाले होते, परंतु शरीर खूपच खालावल्यामुळे त्यांचे २५ तारखेला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 
श्री.परमेश्वर धाये यांनी २२ वर्ष सैनिक म्हणून उत्तम सेवा बजावली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या गावच्या विकासावर भर दिला.
 गावातील लोकांचे वाद-विवाद होऊ नये गावामध्ये तंटा निर्माण होऊ नये म्हणून सर्व ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी तंटामुक्तीचे अध्यक्ष पद दिले.
ही सेवा त्यांनी कर्तव्यदक्षपणे बजावली. गावात त्यांचा एक प्रकारे दराराही होता.

त्यांचे लहान भाऊ हे SVCS हायस्कूल भवानी पेठ येथे उपमुख्याध्यापक पदावर आहेत.
तर मधले भाऊ श्रीशैल धाये हे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. 
परमेश्वर धाये यांना दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
मुलगा दैनिक लोकमत वृत्तपत्रात chief executive officer जळगाव महाराष्ट्र या पदावर कार्यरत आहे

अत्यंत प्रेमळ,मनमिळावू स्वभावाच्या परमेश्वर धाये यांचा सामाजिक कार्यात कायम सहभाग असायचा.
त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी, दोन मुली,मुलगा,पुतणे, पुतण्या,सुना,जावई,भाऊ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

पेन्शन विधायकाविरुद्ध फ्रान्समध्ये तीव्र लढा;सरकार विरोधी घोषणाबाजी..!

पेन्शन विधायकाविरुद्ध फ्रान्समध्ये तीव्र लढा सरकार विरोधी घोषणाबाजी

फ्रान्समध्ये पेन्शन सुधारणा विधेयका विरोधात गुरुवारी विविध शहरांमध्ये 200 हून अधिक निदर्शने झाली.
सरकारच्या निर्णयाविरोधात लोक रस्त्यावर उतरले.राजधानी पॅलेस मध्ये सुमारे आठ लाख लोकांनी मोर्चा काढला रात्री उशिरा अनेक आंदोलकांनी पोलिसांची झटापट ही झाली युनियनच्या वतीने निदर्शने करणाऱ्या लोकांच्या हातात झेंडे पोस्टर आणि बॅनर होते.


त्यावर पेन्शन बिल आणि सरकार विरोधी घोषणा लिहिल्या होत्या. निवृत्तीचे वय 62 वरून 64 पर्यंत वाढवण्याचे विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान बहुतेक शहरांमध्ये शाळा आणि महाविद्यालय बंद राहिली 
काही शहरांमध्ये आंदोलकांनी बस स्टॉप होर्डिंग दुकानाचे खिडक्या आणि वृत्तपत्रांच्या स्टॉलची तोडफोड केली.
 यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रूधूराचा वापर केला. या चकमकीत सुमारे 120 पोलीस जखमी झाल्याची माहिती फ्रान्सचे ग्रहमंत्री यांनी दिली.
त्याचवेळी आंदोलकांमधील सुमारे 100 जणांना ताब्यात घेण्यात आले यापूर्वी 22 मार्च रोजी दिलेल्या मुलाखतीत अध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले होते की मला या विधायकाबद्दल कोणतीही पश्चाताप नाही.
 देश हितासाठी हे आवश्यक आहे पंतप्रधान आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत मला फक्त एकाच गोष्टीचे खंत वाटते
की
 मी फ्रेंच लोकांना या विधेयकाची गरज पटवून देऊ शकलो नाही कोरोनानंतर देशात महागाई वाढली आहे
त्यामुळे आम्हाला या विधेयकाची गरज आहे असे ते म्हणाले.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये 4 % टक्क्यांच्या वाढीला सरकारची मंजुरी

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये 4% टक्क्यांच्या वाढीला सरकारची मंजुरी

सरकारने एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठी भेट दिली आहे.
सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत चार टक्क्यांनी वाढ केली आहे.
 आता दोन्ही 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
सध्याची वाढ एक जानेवारी 2023 पासून लागू होईल.
यामुळे सरकारवर दरवर्षी 12815 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा वाढणार आहे.


डी ए ची थकबाकी मिळेल का? 
केंद्राने 18 महिन्यांच्या डीए थकबागेचा स्पष्टीकरण जारी केले होते कर्मचाऱ्यांची 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी दिली जाणार नाही असे सांगण्यात आले होते. 
कोविड महामारीच्या काळात हे थांबवण्यात आले होते 
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर 2020 मध्ये महागाई भत्ता आणि महागाई मदतचे तीन हप्ते थांबवले होते
 या वेळेपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक प्रलंबित थकबाकी बाबत अपडेट ची प्रतीक्षा करत आहेत या निर्बंधामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे 34 हजार कोटी रुपये थकले आहेत.
केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या डीए आणि डी आर मध्ये वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारणा केली जाते सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दिला जातो तर निवृत्त वेतनधारकांना महागाई भत्ता दिला जातो. 
सध्याची दरवाढ एक जानेवारी 2023 पासून लागू होईल.