Tuesday, 19 November 2024

आजच्या महत्त्वाच्या बातम्या बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४

या गोष्टी केल्यास होऊ शकतो तुरुंगवास?या गोष्टी करणे टाळाच....

⭕महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी बुधवारी (20 नोव्हेंबर 2024) मतदान होणार आहे.

नागरिकांना या निवडणुकीत मतदान करणाऱ्यासाठी जसं मतदान यादीत नाव असणं आवश्यक आहे, तसंच मतदान केंद्रावर गेल्यावर मतदान ओळखपत्र दाखवणंही आवश्यक आहे.

जर निवडणूक आयोगाकडून देण्यात येणारं ओळखपत्र नसेल किंवा गहाळ झालं असेल, तर अशावेळी काय करावं असाही प्रश्न काही मतदारांना पडतो. याबाबतच निवडणूक आयोगाने आणि राज्याच्या माहिती संचलनालयाने माहिती दिली.


👆👆👆वरील लिंक चा वापर करून आपणास आपला मतदान बूथ क्रमांक सहज पाहता येईल.
या ठिकाणी आपण आपले पूर्ण नाव मोबाईल नंबर अथवा मतदान क्रमांक टाकून आपण आपला मतदान केंद्र सहज पाहता येईल...
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
काय करू नये---
१.मतदान केंद्रावर तोतयागिरी करणे हा अपराध आहे.
२.मतदान करण्याच्या बदल्यात लाच घेणे.
३.मतदान प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नये अन्यथा तुरुंगवास होऊ शकतो.
४.ईव्हीएम मशीन किंवा अन्य साहित्याची हानी नुकसान पोहोचवू नका.
५.मतदान पथकाला मतदान प्रक्रिया दरम्यान बाजार आणू नका अन्यथा आपणास कारावास होऊ शकतो.
यासोबतच मतदान केंद्रात व मतदान केंद्र परिसरात थुंकणे अथवा घाण करणे किंवा पसरवणे हाही अपराध आहे.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
शक्यतो या गोष्टी मतदान केंद्रावर घेऊन जाणे टाळावे-
१.मोबाईल फोन
२.धूम्रपान वस्तू
३.शस्त्र
४.कॅमेरा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
⭕काय करावे--
१.रांगेमध्ये उभे रहा आणि आपला नंबर येईपर्यंत वाट पहा कृपया बूथ वर गोंधळ अथवा दंगामस्ती करू नये.

२.मतदान केंद्रावर शांतता राखा.

३.भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले छायाचित्र ओळखपत्र अथवा निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली ओळखपत्र जाताना सोबत घेऊन जा.

४.मतदान पथक हे आपले च कर्मचारी आहेत त्यांच्याशी सौजन्याने वागा.
मतदान केल्यानंतर कृपया शांततेत घरी जा.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
यामधील कोणतीही एक ओळखपत्र मतदानासाठी वापरता येईल--
हे' आहेत 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे
1. आधार कार्ड
2. मनरेगा रोजगार ओळखपत्र
3. बँक किंवा टपालाचे फोटोसह पासबूक
4. पारपत्र (पासपोर्ट)

5. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
6. पॅनकार्ड
7. भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड
8. कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

9. केंद्र किंवा राज्य शासनाचे निवृत्ती वेतनाचे दस्तावेज
10. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र
11. संसद सदस्य (खासदार), विधानसभा/विधानपरिषद सदस्य (आमदार) यांचे अधिकृत ओळखपत्र
12. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र
(अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
मतदान आपल्या सर्वांना समान बनवते.
ही एकमेव गोष्ट आहे जी जाती धर्म किंवा वर्ग यांच्यात भेदभाव करत नाही.
आपण मतदान नक्की करा व आपल्या सोबत आपला परिवार व आपल्या शेजाऱ्यांना सुद्धा नक्की घेऊन जा..
राहुल दत्तात्रय म्हमाणे
प्राथमिक विद्या मंदिर बार्शी
9822487073/8482824588